Snake hide in hairs video: सोशल मीडियावर सापांचे अनेक व्हिडीओ रोज व्हायरल झाले आहेत. साप हा शब्द जरी उच्चारला तरी अंगावर काटा येतो. साप हा असा सरपटणारा प्राणी आहे जो कधीही कुठेही लापून बसू शकतो. गावात किंवा जंगलाच्या आजूबाजूला असलेल्या मानवी वस्तीत साप हमखास पाहायला मिळतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सापाची भीती वाटते. सोशल मीडियावर सापाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहून अंगावर शहारा येतो. सध्या असाच एक सापाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशात एक साप अशा ठिकाणी अडकून बसला की तुम्ही विचारही करु शकत नाही. एक महिला झोपलेली असताना तिच्या केसात साप फिरत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा थरारक व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.
अनेकवेळा साप लोकांच्या घरात घुसतात, अशा वेळी ते घरात राहणाऱ्या लोकांसाठी मोठा धोका निर्माण करतात. घरात साप दिसला की पायाखालची जमीन सरकते. व्हिडीओमध्ये एक महिला दोन्ही हात डोक्यावर ठेवून पालथी झोपलेली दिसते आहे. ही महिला गाढ झोपेत असून तिच्या केसात एक साप फिरताना दिसतोय. केसात लपलेला हा साप डोक्याच्या पाठच्या बाजूला सरपटत जाण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. या झोपलेल्या महिलेच्या केसात साप कसा रेंगाळत आहे आणि डोक्याच्या मागच्या बाजूला जाण्याचा प्रयत्न करत आहे हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ पाहून लोकांना घाम फुटला आहे. ही महिलाही कदाचीत घाबरल्यामुळे मान खाली घालून झोपली असेल. कारण थोडीशी हालचाल केली तरी काहीही घडू शकतं.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडिओ Kashikyatra नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत २ लाख २६ हजार लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला असूनन १ लाख २८ हजारांपेक्षा अधिक लोकांनी व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, “प्लिज एवढी रीस्क घेऊ नका” तर अन्य एका नेटकऱ्याने म्हटलं, “हा काय वेडेपणा आहे?” सापाच्या व्हिडीओला हजारो व्यूज मिळाले असून व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
© IE Online Media Services (P) Ltd