Viral Video : सोशल मीडियावर स्टंटबाजीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके भयानक असतात की पाहून अंगावर काटा येतो. काही लोक धावड्या गाड्यांच्या दरवाज्यावर किंवा छतावर उभे राहतात, तर काही लोक हात सोडून दुचाकी चालवताना दिसतात. अनेकदा ही स्टंटबाजी जीवघेणी सुद्धा ठरते तरी सुद्धा काही लोक धोका पत्करत स्टंटबाजी करतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण धावत्या कारवर स्टंटबाजी करताना दिसत आहे. पण पुढे त्याच्याबरोबर असं काही घडते, की पाहून कोणालाही धक्का बसेल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुण चालत्या गाडीच्या छतावर बसलेला दिसेल. त्या कारचा दरवाजा उघडा आहे. त्यानंतर तो कारच्या दरवाज्याला धरून उभा राहण्याचा प्रयत्न करतो पण त्याचा तोल जातो आणि तर कारसह घसरत जातो आणि व्हिडीओ इथेच संपतो. हा तरुण स्टंटबाजीच्या नादात जीवाशी खेळत आहे. पुढे या तरुणाबरोबर काय घडले, याविषयी माहिती समोर आलेली नाही. त्याच्या मागून येणाऱ्या कारमधील व्यक्तीने हा व्हिडिओ शूट केला आहे. या व्हिडीओवर लिहिलेय, “हे असलं काही करण्यापूर्वी लक्षात ठेवा तुमची आई घरी वाट पाहत आहे..!” हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याविषयी अद्याप माहिती नाही पण सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ
marathihasyaa या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “पैसा झाला मोठा, माणूस झाला खोटा.” तर एका युजरने लिहिलेय, “स्वत:ला शक्तिमान समजतो का” आणखी एका युजरने लिहिलेय, “याला म्हणतात माज” एक युजर लिहितो, “खूप खुश रहा. माणसाला एकदाच जगायला मिळतं” तर एक युजर लिहितो, “माणसाने मरण खूप सोपं करून घेतलं…” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर संताप व्यक्त केला आहे. काही युजर्सनी कठोर शब्दात या तरुणावर टीका केली आहे.