बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. या व्हिडीओत अमिषा पटेल संजय राऊत यांची गळाभेट घेताना दिसत आहे. मुंबईत ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाचे ट्रेलर लाँच झाले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, अभिनेता सलमान खान यांच्यासह अनेक दिग्गज नेते आणि अभिनेते हजर होते. अमिषा पटेलनेही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

अमिषा पटेलची धर्मवीर चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंग कार्यक्रमला एन्ट्री होताच आयोजकांनी तिची संजय राऊत यांच्याशी भेट घालून दिली. अमिषा आल्याचं पाहताच संजय राऊत यांनी स्वतः खुर्चीवरून उठून तिचं स्वागत केलं. त्यावेळी अमिषाने हस्तांदोलन करत संजय राऊत यांची गळाभेट घेतली. त्यानंतर अमिषा पटेल आणि संजय राऊत यांच्यात काही वेळ चर्चाही झाली. पुढे अमिषा इतर पाहुण्यांना भेटत पुढे केली.

Mallikarjun Kharge interview Congress loksabha elections 2024 PM Narendra Modi BJP
इंडिया आघाडी जिंकली तर नेतृत्व कोण करणार? मल्लिकार्जुन खरगेंनी केला खुलासा
actress Mumtaz visits Pakistan
Video: भारतीय अभिनेत्री पाकिस्तान दौऱ्यावर, लुटला हाऊस पार्टीचा आनंद; गुलाम अली अन् फवाद खानबरोबरचे फोटो केले शेअर
Saranya Ponvannan
पार्किंगच्या जागेवरून वाद अन् थेट जीवे मारण्याची धमकी, प्रसिद्ध अभिनेत्रीविरोधात शेजारणीने पोलिसांत दिली तक्रार
akshay kumar stepped on alaya F dress video viral
भर कार्यक्रमात अक्षय कुमारने ठेवला प्रसिद्ध अभिनेत्रीच्या ड्रेसवर पाय अन् तिने केलं असं काही…, व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओ पाहा :

स्वतः अभिनेत्री अमिषा पटेल देखील संजय राऊत यांच्यासोबतच्या भेटीचा व्हिडीओ शेअर केलाय. या ट्वीटमध्ये तिने म्हटलं, “संजय राऊत यांची धर्मवीर मराठी चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात भेट झाली. धर्मवीर चित्रपटाला खूप साऱ्या शुभेच्छा.”

हेही वाचा : उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचं नाव घेत सलमान खान म्हणाला, “आनंद दिघे आणि माझ्यात दोन गोष्टींमध्ये साम्य त्या म्हणजे…”

अमिषाच्या या ट्वीटखाली सोशल मीडिया युजर्सने संजय राऊत यांच्यावर टीकाही केल्याचं पाहायला मिळत आहे.