२ वर्षाच्या या ऑटिस्टिक मुलाने लाखो लोकांना वेड लावले, त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स एकदा पाहाच!

डिस्ने वर्ल्डमध्ये ट्रिपसाठी आलेला हा २ वर्षाच्या ऑटिस्टिक मुलगा सर्वांनाच मोहित करतोय.

२ वर्षाच्या या ऑटिस्टिक मुलाने लाखो लोकांना वेड लावले, त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स एकदा पाहाच!
(Photo: Youtube/ Amanda Coley)

सोशल मीडियावर सध्या २ वर्षाच्या ऑटिस्टिक मुलाने लाखो लोकांना आपल्या प्रेमात पाडलंय. सध्या या गोंडस चिमुकल्याची चर्चा जोरात सुरूये. हे गोंडस बाळ ऑटिस्टिक असलं तरी त्याची निरागसता लोकांना खूपच भावली आहे. फ्लोरिडा इथल्या वॉल्ट डिस्ने वर्ल्डमध्ये ट्रिपसाठी आलेला हा २ वर्षाच्या ऑटिस्टिक मुलगा सर्वांनाच मोहित करतोय.

जॅक्सन असं या गोंडस मुलाचं नाव असून त्याला नॉन वर्बल ऑटिझम आहे. त्याची आई एक छायाचित्रकार असून त्यांच्या मते, हा गोंडस मुलगा अनोळखी लोकांसमोर लाजतो. पण स्नो व्हाईट पाहिल्याबरोबर त्याचे हावभाव लगेच बदलून गेले. या मुलाला त्याची आई लाडाने ‘जॅक’ म्हणते. जेव्हा स्नो व्हाइट त्याने पाहिलं तेव्हा तो व्हिडीओमध्ये लाजेने अगदी गुलाबी झालेला दिसत आहे. हे गोंडस बाळ डिस्ने राजकुमारीच्या मांडीवर बसलेले दिसत आहे. हा मुलगा इतका लाजतो की मांडीवर डोकं ठेवून तो आपल्या एक्सप्रेशन्सने लाखो लोकांना वेड लावतो.

आणखी वाचा : जेव्हा नेटकरी म्हणाले, ‘Thor तुझा हातोडा मीराबाई चानूला दे’ , मग Chris Hemsworth ने काय प्रतिक्रिया दिली पाहा…

या गोंडस बाळाचा व्हिडीओ त्याची आई अमांडा कोली यांनी सोशल मीडियावर अपलोड केला होता. त्यानंतर हा व्हिडीओ बघता बघता व्हायरल देखील झाला. आपल्या मुलाला डिस्ने राजकुमारीशी संवाद साधताना पाहताना किमान १००० वेळा रडली, असं लिहित या आईने हा व्हिडीओ शेअर केला. तीन मुलांची आई असलेल्या कोलीने सांगितले की, तिचा मुलगा सहसा अनोळखी व्यक्तींमध्ये अस्वस्थ असतो. “जर त्याला वाटले की मी त्याला त्या अनोळखी लोकांसोबत सोडत आहे तर तो खूप अस्वस्थ होतो आणि रडू लागतो,” बहुतेक वेळा तो त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आणि पळून जातो.

आणखी वाचा : हत्तींसोबत सेल्फी घेण्यासाठी रस्त्यातच गाड्या थांबवल्या, पुढे काय घडतं? पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : ‘हेलिकॉप्टर भेळ’ कधी चाखलीय का? मग हा VIRAL VIDEO एकदा पाहाच!

जॅकला राजकन्येने मिठी मारताना पाहणे खूप आनंददायी आहे. त्याने तिला धरले, तिच्याकडे पाहिले आणि गोड स्माईल देत तो तिला सोडायला तयार नव्हता. याचा व्हिडीओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. हा व्हिडीओ आतापर्यंत सर्वांत गोंडस असेल, हे मात्र नक्की.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Video of an autistic boy falling in love with snow white at disney world will make you emotional non verbal kid viral video prp

Next Story
Optical Illusion: चित्रात लपलेला प्रसिद्ध सेलिब्रिटीचा चेहरा तुम्ही ओळखू शकता का? ९९ टक्के लोकांनी दिलं चुकीचे उत्तर
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी