Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ भावुक करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये खरं प्रेम म्हणजे काय, हे तुम्हाला आजोबा सांगताना दिसेल. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक कारचालक वृद्ध व्यक्तीबरोबर संवाद साधताना दिसत आहे. वृद्ध व्यक्ती त्याच्या पत्नीविषयी बोलताना प्रेमाची खरी परिभाषा समजावून सांगतो, हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल.
पती पत्नीचे नाते हे जगावेगळे असते. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा आणि आपुलकी दिसून येते. लग्नानंतर दोन व्यक्ती एकत्र येतात आणि नव्या आयुष्याची सुरुवात करतात. एकमेकांच्या सुख दुखात साथ देतात आणि एकमेकांच्या कायम सोबत असतात. पण जेव्हा जोडीदार आपल्याला कायमचा सोडून जातो, ते दु:ख असह्य असते. या व्हायरल व्हिडीओमध्ये आजोबा एका कारचालकाला त्यांच्या पत्नीविषयी सांगताना दिसत आहे ज्या आता या जगात नाही.
वृद्ध व्यक्ती – लग्न केले होते पण माझी पत्नी एक वर्ष, तीन महिने, पाच दिवसानंतर देवाघरी गेली. आम्हाला सोडून गेली
कारचालक – मग पुन्हा लग्न केले नाही?
वृद्ध व्यक्ती – नाही केले. माझं तिच्यावर खूप प्रेम होतं. जखम आहे मुला. मी तिला वचन दिले होते देवाच्या घरी फक्त तुझ्याबरोबरच भेट होईल.. जगातील कोणत्याही गोष्टीबरोबर भेट होणार नाही. मी तिला शब्द दिला होता आणि मी माझ्या शब्दावरून मागे फिरू शकत नाही.
कारचालक आणि वृद्ध व्यक्तीबरोबरचा हा संवाद ऐकून कोणीही भावुक होईल. प्रेम काय असतं, हे या व्हिडीओतून दिसून येईल.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
gyanclasss या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “प्रत्येक माणूस या वृद्ध व्यक्तीसारखा प्रामाणिक असायला हवा.”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खरं प्रेम” तर एका युजरने लिहिलेय, “देव करो, ती तुम्हाला प्रत्येक जन्मात मिळो” आणखी एका युजरने लिहिलेय, “जेव्हा पुरुष खरंच प्रेमात असतो” एक युजर लिहितो, “व्हिडीओ पाहून रडायला आले”