तुम्ही प्राणी प्रेमी आहात का? मग तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल. सोशल मिडियावर कित्येक व्हिडिओ दररोज चर्चेत असतात ज्यामध्ये काही व्हिडिओ प्राण्यांचे देखील असतात. कधी कुत्रा, कधी मांजर, कधी माकड..अश्या प्राण्यांचे मजेशीर व्हिडिओ सोशल मिडियावर सर्रास पहायला मिळतात. असाच एका हत्तीणीचा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे, जी चक्क फुटबॉल खेळत आहे. होय! तुम्ही बरोबर ऐकत आहात. विश्वास बसत नसेल तर आधी हा व्हिडिओ पाहा. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर नक्की हसू येईल.
या व्हिडिओमध्ये कटेल येथील श्री दुर्गापरमेश्वरी मंदिरामध्ये गिरीजा उर्फ महालक्ष्मी नावाची 31 वर्षीय मादी हत्ती फुटबॉल खेळताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. मंदिराला भेट देणारे भाविक अनेकदा हत्तीसोबत सेल्फी घेताना दिसतात. हे मंदिर कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यात आहे. 1994 मध्ये या मादी हत्तीला कटेल येथील श्री दुर्गापरमेश्वरी मंदिरात आणण्यात आल्याचे सांगितले जाते.
मंदिरात फुटबॉल खेळते ही मादी हत्ती
या मादी हत्तीला फैरोज आणि अतलाफ नावाच्या तरुणांनी प्रशिक्षण दिल्याची माहिती आहे. मंदिराच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्ती गेल्या आठ महिन्यांपासून क्रिकेट आणि फुटबॉल खेळत आहे. त्यांनी असेही सांगितले की, मादी हत्ती साधारणपणे दररोज दोन तासांपेक्षा जास्त वेळ फुटबॉल आणि क्रिकेट खेळते.
हेही वाचा – अवघडच आहे राव! गुगलमध्ये नोकरी लागलेल्या व्यक्तीला भाड्याच्या घरासाठी द्यावी लागली मुलाखत, पुढे झाले असे की…
क्रिकेट देखील खेळते महालक्ष्मी हत्ती
पूर्वी मंदिरात एक नर हत्ती होता, जो नागराज नावाने ओळखला जात असे. पण, त्यांच्या मृत्यूनंतर, महालक्ष्मी या मंदिरात आली तेव्हा ती फक्त 5 वर्षांची होती. आता तिला विविध प्रकारचे खेळ खेळण्यासाठी नियमित प्रशिक्षण दिले जात आहे. यापूर्वी महालक्ष्मीचा काही मुलांसोबत क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला होता.
असा आहे महालक्ष्मी हत्तीचा रोजचा दिनक्रम
मादी हत्ती नियमितपणे देवाची पूजा करण्यापूर्वी सकाळी स्नान करते. महालक्ष्मी सकाळी सात वाजता आंघोळ करतात असा दावा तिला सांभळणाऱ्यांनी केला आहे. त्यानंतर ती सकाळी 10.30 च्या सुमारास गवत, तांदूळ, गूळ, केळी आणि काकडी खाते. त्यानंतर, ती दुपारी 2.45 वाजता हिरव्या भाज्या आणि 1.30 वाजता ज्वारीचे गोळे खातात. त्यानंतर ती दुपारी 3.30 ते 6.30 पर्यंत झोपते. रात्री ती गवत आणि केळी खाते. शिवाय, डॉक्टर दर सहा महिन्यांनी वैद्यकीय तपासणीही करतात.