Viral Video : आजोबा आणि नातवंडं याचे नाते हे जगावेगळे असते. आजोबांसाठी त्यांचे नातवंडं हे दुधावरची साय असते. त्यांच्यासाठी नातवंड अगदी जीव की प्राण असते. या नात्यात प्रेम, जिव्हाळा, आपुलकी आणि मैत्री असते. बालपणी नातवंडाचा पहिला मित्र हा आजोबा असतो. या आजोबाबरोबर त्याला खेळायला आवडते, खळखळून हसायला आवडते, फिरायला आवडते. त्यांच्या नात्यात एक आगळा वेगळा गोडवा दिसून येतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला आजोबा आणि नातवाच्या नात्यातील सुंदर सलोखा दिसून येईल. हा व्हिडीओ पाहून काही लोकांना त्यांचे बालपण आठवेल तर काही लोकांना त्यांचे आजोबा आठवणार.

हा व्हायरल व्हिडीओ एका लोकल ट्रेनमधील आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक आजोबा त्यांच्या नातवासह लोकलमध्ये प्रवास करत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल लोकलच्या डब्यात बसायला जागा नाही. नातवाला उभं राहायला लागू नये म्हणून त्याला उंचावर धरून ठेवले आहे. नातू एका हाताने कडी धरून उभा आहे तर एका हाताने आजोबांचे गमतीने केस ओढताना दिसत आहे. आजोबा सुद्धा खळखळून हसताना दिसत आहे आणि नातवाबरोबर मजा करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. काही लोकांना त्यांचे आजोबा व त्यांच्याबरोबर घालवलेले सुंदर क्षण आठवतील. तर काही लोकांच्या बालपणीच्या आठवणी ताज्या होतील.

पाहा व्हायरल व्हिडीओ

https://www.instagram.com/reel/DJgPg-OxQX5/?igsh=MWttMzdkbzJ5NzEwYw%3D%3D

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

shhreyassx या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “नातवाचा पहिला मित्र आजोबा आणि आजोबाचा शेवटचा मित्र म्हणजे नातू …” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “कधीच मला न भेटलेलं सुख” तर एका युजरने लिहिलेय, “आजोबा म्हणजे आयुष्यातील सर्वात सुंदर शिदोरी” आणखी एका युजरने लिहिलेय, “व्हिडीओ पाहून जुने दिवस आठवले” एक युजर लिहितो, “आजोबाशिवाय बालपण हे अपूर्ण आहे” तर एक युजर लिहितो, “आयुष्यातील हे दिवस कधीही परत येत नाही” अनेक युजर्सनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.