scorecardresearch

Video: होळीच्या दिवशी कॅमेऱ्यात कैद झाले भितीदायक दृश्य! फुगा फेकताच हायवेवर उलटली रिक्षा

शुक्रवारी दुपारी एक रिक्षा बागपतहून दिल्लीच्या दिशेने वेगाने जात होती.

Horrible scene on holi day
व्हायरल व्हिडीओ (फोटो: @wasect / Twitter)

उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ शुक्रवारच्या होळीचा आहे. ज्याने हा व्हिडीओ पाहिला तो हादरला. प्रत्यक्षात होळीच्या दिवशी शुक्रवारी महामार्गावर एक रिक्षा भरधाव वेगात येत होती, त्यादरम्यान तरुणांनी पाण्याने भरलेला फुगा त्या रिक्षेच्या दिशेने फेकला, त्यामुळे रिक्षेचं नियंत्रण सुटले आणि रिक्षा महामार्गावर उलटला.

शुक्रवारी दुपारी एक रिक्षा बागपतहून दिल्लीच्या दिशेने वेगाने जात होती. ज्यामध्ये अनेक प्रवासी बसले होते.त्याचवेळी ती रिक्षा काठा गावात पोहोचली असता तेथे होळी खेळणाऱ्या तरुणांनी रंगीत पाण्याने भरलेला फुगा रिक्षाच्या दिशेने फेकला. चालकाने वाचवण्याच्या प्रयत्नात असताना रिक्षा राष्ट्रीय महामार्गावर अनियंत्रितपणे उलटली. यानंतर होळी खेळणाऱ्या तरुणइकडेतिकडे धावू लागले. सुदैवाने रिक्षामध्ये बसलेल्या प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही.

(हे ही वाचा: ‘पुष्पा’मधील ‘सामी सामी’ गाण्यावर चक्क हत्तीने धरला ठेका!; Video Viral)

(हे ही वाचा: Video: चालकाविना अचानक चालू लागली रिक्षा, हे दृश्य पाहून नेटीझन्स झाले हैराण!)

ही घटना घडत असताना कोणीतरी अपघाताचा व्हिडीओ बनवला आणि आता तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. याबाबत तक्रार आल्यावर कारवाई केली जाईल, असे कसबा चौकीचे प्रभारी रामकुमार यांनी सांगितले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Video of holi 2022 rickshaw overturned on the highway after throwing balloons ttg

ताज्या बातम्या