Viral Video : नवरा बायकोचे नाते हे जगावेगळे असते. या नात्यात प्रेम, काळजी अन् जिव्हाळा असतो. लग्नानंतर दोन अनोळखी व्यक्ती एकत्र येतात आणि नव्या आयुष्याची सुरुवात करतात. आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचे वचन देतात. नवरा बायकोमध्ये छोटी मोठी भांडणं होत असतात. नात्यामध्ये रुसवाफुगवी दिसून येते. कितीही भांडले तरी नवरा बायको एकमेकांशिवाय राहू शकत नाही. एकमेकांना सॉरी म्हणून ते भांडणं मिटवतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक अँकर पुरुष आणि महिलांना जोडीदाराबरोबर भांडण झाल्यानंतर जोडीदाराला शांत कसं करता, असा प्रश्न विचारताना दिसतोय. त्यावर पुरुष आणि महिला भन्नाट उत्तरं देताना दिसतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा व्हायरल व्हिडीओ एका सार्वजानिक कार्यक्रमातील आहे. अँकर सुरुवातीला पुरुषांना विचारतो, बायको जर रागात असेल तर तिला गप्प करण्यासाठी काय करता?
त्यावर काही पुरुष भन्नाट उत्तरं देताना दिसतात.
पुरुष १ – कुलर लावायचा
पुरुष २ – शॉपिंगला घेऊन जायचं
पुरुष ३ – एकच शब्द वापरायचा – सॉरी
पुरुष ४ – तिच्याशी गोड गोड बोलायच
पुरुष ५ – आपण गप्प राहायच
पुरुष ६ – थंड एक ग्लास पाणी पाजायच
पुरुष ७ – गाडी असेल तर गाडीमध्ये बसून लॉन्ग ड्राइव्हला घेऊन जाऊन फिरवून आणायच

हेही वाचा : ‘फक्त १० रूपयांसाठी सोडली माणुसकी!’ कंडक्टरची वृद्धाला मारहाण, तो होता माजी IAS अधिकारी…Viral Videoमध्ये पाहा काय घडले?

त्यानंतर अँकर पुढे महिलांना विचारतो की नवरा जर रागात असेल, तर त्याला शांत करण्यासाठी तुम्ही काय कराल?

महिला १ – आपण जास्त रागात यायचं
महिला २ – त्यांचं आवडतं गाणं म्हणायचं आणि त्यांना घेऊन डान्स करायचा
महिला ३ – त्यांना म्हणायचं, अहो का रागात आहात? सॉरी
महिला ४ – त्यांचा आवडीचा पदार्थ बनवायचा
महिला ५ – आपली चूक असेल तर शांत बसायचं जर चूक नसेल तर बोलत बोलत विषयांतर करायचं

पुरुष आणि महिलांचे हे उत्तर ऐकून तुम्हालाही हसू आवरणार नाही. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : त्यांचा जीव महत्त्वाचा नाही का? ऊस वाहून नेणारा बैल रस्त्यातच बसला अन्… ; काळजाचे पाणी करणारा VIDEO

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral)

sushilsuryawanshi05 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर लिहिलेय, “भांडण झाल्यावर बायकोला शांत कसं करावं?” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.