Viral video : पावसाळ्यात सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी पावसाच्या पाण्याचे तर कधी नदी-नाल्याला आलेल्या पुराचे. काही व्हिडीओ इतके भयानक असतात की पाहून अंगावर काटा येतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की काही शाळकरी मुले शाळेत जाण्यासाठी जीवघेणा पायी प्रवास करतात. ते जीव मुठी घेऊन शाळेत जातात. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की नदीला पूर आला आहे आणि बंधाऱ्याच्या वरून पाणी जात आहे. हे शाळकरी विद्यार्थी साखळी करून गुडघ्याभर पाण्यातून रस्ता ओलांडताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक व्यक्ती दिसेल. त्याच्या हातात काठी आहे आणि त्याच्या खांद्यावर एक चिमुकला विद्यार्थी बसला आहे. या व्यक्तीबरोबर आणखी सहा विद्यार्थी तुम्हाला दिसेल जे एकमेकांचा हात पकडून बंधाऱ्यावरून जात आहे. हे शाळकरी विद्यार्थी जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहे.
हा व्हिडीओ पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील म्हसेपाडा या गावचा आहे. पावसाळ्यात चार महिने यांना असा जीवघेणा प्रवास करावा लागतो. गारगाई आणि पिंजाळ नदीच्या संगमावर वसलेल्या म्हसेपाडा या गावाला जाण्यासाठी कोणताही रस्ता नाही त्यामुळे गावकऱ्यांना गारगाई नदीवर असलेल्या बंधाऱ्यावरून नदी ओलांडावी लागते पण पावसाळ्यात गावकऱ्यांचे खूप हाल होतात. चिमुकल्या विद्यार्थ्यांना रोज जीवघेणा प्रवास करून शाळेत जावे लागते.
पाहा व्हिडीओ (Viral Video)
bhagat___anil या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर लिहिलेय, “या मुलांचे आयुष्य किती कठीण आहे बघा. मुठीत जीव घेऊन जावं लागतय शाळेत” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “सरकारला लक्ष देता येत नाही का, काय कामासाठी आहे मग सरकार? काय फक्त स्वतःचा विचार करतो?” तर एका युजरने लिहिलेय, “काय करणार जे आहे ते आहे आता आपण काय करू शकतो” आणखी एका युजरने लिहिलेय, “
महाराष्ट्र शासन फक्त रस्त्यांचे खड्डे पडलेत त्याच्यावर लक्ष देताहेत, अशा ठिकाणी लक्ष द्यायला प्रशासन फक्त आश्वासन देतील” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर संताप व्यक्त केला आहे.