Viral Video : मुंबई म्हणजे स्वप्नांची नगरी. आधुनिक आणि ऐतिहासिक सौंदर्याचे मिश्रण असेलली मुंबई प्रत्येकाला हवीहवीशी वाटते. मुंबईमध्ये अनेक पर्यटन स्थळे आहे जिथे दरदिवशी हजारो लोक भेट देतात. यगेटवे ऑफ इंडिया, हँगिंग गार्डनर, हाजी अली दर्गा, सिद्धिविनायक मंदिर, छत्रपती शिवाजी टर्मिनस, कुलाबा कॉजवे, जुहू बीच, गोराई बीच, आणि अक्सा बीच सारखे अनेक समुद्रकिनारे आणि सर्वात आकर्षक ठिकाण म्हणजे
मरीन ड्राईव्ह. समुद्राच्या काठावर असलेले हे ठिकाण, सूर्यास्ताचा अविस्मरणीय अनुभव घेण्यासाठी विशेष लोकप्रिय आहे. अनेक जण दिवसभराची कामे करून क्षणभराचा विसावा घेण्यासाठी आणि सायंकाळचा सूर्यास्त बघण्यासाठी येथे गर्दी करतात. दरदिवशी मरीन ड्राइव्हवर लोकांची गर्दी असते. सूर्यास्ताच्या वेळी हा आकडा आणखी वाढतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दादर चौपाटी येथील विलोभनीय सूर्यास्ताचे दृश्य तुम्हाला दिसेल.

हा व्हायरल व्हिडीओ दादर चौपाटीचा आहे. व्हिडीओत तुम्हाला सुंदर सूर्यास्ताचे दर्शन होईल. हा सुंदर सूर्यास्त पाहून मन थक्क होईल. अनेक जण कॅमेरा आणि मोबाईलमध्ये हे सुंदर दृश्य कैद करताना दिसत आहे. काही लोक किनाऱ्यावर बसून या सुंदर दृश्याचा आनंद घेत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला मुंबईच्या सौंदर्यचे खऱ्या अर्थाने दर्शन घडेल. या व्हिडीओवर लिहिलेय, “तुम्ही पाहिला का आजचा Sunset?” हा व्हिडीओ ३ मे रोजी शेअर केला आहे. याचा अर्थ ३ मे २०२५ चा हा व्हिडीओ आहे जो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

shivajipark_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून हा व्हिडीओ जवळपास दोन लाख लोकांनी लाइक केला आहे. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आमच्यासाठी हे रोजचच आहे. कारण आम्ही प्रभादेवी चौपाटी जवळ राहतो व तिथेच लहानाचे मोठे झालो.” तर एका युजरने लिहिलेय, “मुंबईचा समुद्र आणि सूर्यास्त म्हणजे एक वेगळा सुकून” आणखी एका युजरने लिहिलेय, “या क्षणाचा आनंद पैशाने मोजता येत नाही.” एक युजर लिहितो, “निसर्गाची किमया आणि कलाकाराची जादू टिपणारा व्हिडीओ”