साऊथची अभिनेत्री प्रिया प्रकाश सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती दररोज फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. ती त्या पोस्टद्वारेच नवीन प्रोजेक्ट्सची माहितीही देत असते. प्रिया प्रकाश तिच्या एका व्हिडीओने रातोरात प्रसिद्ध झाली. प्रियाचा डोळे मारतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तेव्हा पासून तिलानॅशनल क्रश असही बोललं जात. आता प्रिया प्रकाशने तिचा लेटेस्ट व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये प्रियाची वेगळी स्टाइल दिसत आहे.
‘जब सैयां आये शाम को तो लग गये चांद मेरे नाम को’ या गाण्यावर तिने रील शेअर केलं आहे. यामध्ये प्रियाची इंडियन ब्युटी दिसून येत आहे. तिने निळ्या रंगाचा पारंपारिक पोशाख स्कर्ट आणि ब्लाउज घातला आहे. नेकलेस आणि कानातल्यांसोबतच ट्रॅडिशनल लूक देण्यासाठी तिने सुंदर बिंदीही लावली आहे.
(हे ही वाचा: पीव्ही सिंधूचा ‘कच्चा बदाम’ गाण्यावर भन्नाट डान्स, Video Viral)
(हे ही वाचा: Viral: नवजात बाळावरही चढला ‘पुष्पा’ फिवर! IAS अधिकाऱ्यांनी शेअर केला Video)
चाहत्यांना हा व्हिडीओ खूप आवडला आहे. एका चाहत्याने लिहिले, “क्रश.” तर दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, “उफ ये अदा.” त्याच वेळी, अनेक चाहत्यांनी कमेंट विभागात हार्ट आणि फायर इमोजीही पोस्ट कमेंट केल्या आहेत.