Viral Video : अनेक जण चित्रपटांवरील गाण्यावर रिल्स आणि व्हिडीओ बनवतात आणि सोशल मीडियावर शेअर करतात. अगदी लहान मुले, तरुण मंडळी आणि वृद्ध लोक सुद्धा आवडीने व्हिडीओ बनवतात. काही व्हिडीओ इतके व्हायरल होतात की त्यावर हजारो -लाखो लाइक्स आणि व्ह्युज येतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या व्हिडीओमध्ये एक आज्जी आजोबा एका बॉलीवूड गाण्यावर रिल बनवताना दिसत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल एक आजी आजोबा बसलेले आहेत आणि ते बॉलीवूडमधील अतिशय लोकप्रिय असलेल्या ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटातील “ये कैसा लडका है.. ये कैसी लडकी है” गाण्यावर रिल बनवताना दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की आज्जी आणि आजोबा गाण्याचे लिरिक्स अॅक्शनसह एक एक लाइन म्हणताना दिसत आहे. त्यानंतर शेवटच्या दोन लाइन म्हणायला आणखी दोन आज्जी या व्हिडीओमध्ये येतात आणि शेवटी चारही जण एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून या रिलचा शेवट करतात. त्यांचा हा व्हिडीओ पाहून तुम्ही चक्क शाहरूख खान आणि काजोलला विसराल. वय हा फक्त आकडा असतो. कोणतीही गोष्ट करण्याची आवड असावी लागते. हे तुम्हाला या व्हिडीओतून दिसून येईल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
shantai_second_childhood या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर लिहिलेय, “वयाच्या ८० व्या वर्षी मी आणि माझी बेस्टी” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “या लोकांमध्ये किती सकारात्मकता आहे. एनर्जेटीक सुंदर व्हिडीओ” तर एका युजरने लिहिलेय, “जुलै महिन्यातील सर्वात सुंदर रिल” आणखी एका युजरने लिहिलेय, “किती क्युट व्हिडीओ आहे” एक युजर लिहितो, “दोघेही किती गोड आहेत” तर एक युजर लिहितो, “कितीदा पाहू ही रील, तरीही पुन्हा पुन्हा पाहावी वाटते ” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. काही युजर्सनी त्यांच्यावर कौतुकचा वर्षाव केला आहे. शांताई वृद्धाश्रमातील हा व्हिडीओ आहे. या वृद्धाश्रमातील लोक सुंदर सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांच्या प्रत्येक व्हिडीओवर लोक लाइक आणि कमेंट्सचा वर्षाव करतात.