पुण्यातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी येथील लोकप्रिय ठिकाणांचे व्हिडीओ, तर कधी येथील पुणेरी पाट्या चर्चेत येतात. कधी पुणेरी लोकांचे टोमणे तर कधी येथील पीएमटीच्या बसमधील गमती जमती, प्रवासी कंडक्टरमधील भांडणाचे व्हिडीओ सुद्धा व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका कार चालकाला सिग्नल तोडणे चांगलेच महागात पडले. या सिग्नल तोडणाऱ्या कार चालकाबरोबर नेमके काय घडले, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला तुम्हाला एक ट्रॅफिक सिग्नल दिसेल. एक कार चालक सिग्नल तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे पण असे सिग्नल तोडून जाणे, त्याला चांगलेच महागात पडले आणि तो सिग्नलच्या मधोमध अडकला. त्याच्या अवतीभोवती गाड्या जमल्या होत्या. काही लोक हॉर्न वाजवत त्याला मागे जाण्यास सांगत होते. तेव्हा एक संतापलेला दुचाकी चालक त्याला गाडी मागे घेण्यास सांगतो. तो संतापून म्हणतो, “मागे घे गाडी, मागे घे. सिग्नल बघ ना हिरवा आहे, तुला दिसत नाही का? हे सर्व कॅमेऱ्यात दिसतं. तुला हिरवा, लाल पिवळा सिग्नल दिसत नाही का? मागे घे गाडी.” त्याने सिग्नल तोडल्याने आजुबाजूला गाड्या अडकल्या होत्या. संतापलेला दुचाकी चालक बोलून सुद्धा कार चालक वाद घालत होता. तेव्हा पुन्हा दुचाकी चालक त्याला गाडी मागे घेण्यास सांगतो.
या व्हिडीओवर लिहिलेय, “पुण्यातील सिग्नल तोडणाऱ्या चालकाला अहंकार नडला” त्या खाली व्हिडीओवर लिहिलेय, “पुणे ट्रॅफिक पोलीस कुठे आहेत?”
पाहा व्हायरल व्हिडीओ
https://www.instagram.com/reel/DJqQJDqKPIl/?igsh=MW9xOWV1aDQyYW9tMA%3D%3D
shahaanpana.in या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कधीच अहंकार करू नये” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “सिग्नल तोडायचा आणी रुबाब दाखवायचा..” तर एका युजरने लिहिलेय, “आमच्या समोरून असे किती तरी लोक चुका करतात पण स्वतःला कधी आरटीओ नाही समजलं आम्ही” आणखी एका युजरने लिहिलेय, “भावा तू बोल पण अपशब्द बोलू नको”