Pune Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही लोक त्यांची कला सादर करतात तर काही लोक त्यांच्यामध्ये असलेली हटके क्रिएटिव्ही दाखवतात. काही लोक त्यांना आलेले चांगले वाईट अनुभव सुद्धा शेअर करतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये पुण्याची एक तरुणी तिच्याबरोबर घडलेला वाईट अनुभव सांगताना दिसत आहे. तिला आलेला वाईट अनुभव ऐकून तुम्हालाही संताप येईल. या व्हिडीओच्या माध्यमातून ती मुलींना स्टँड घेण्याचे आवाहन करताना दिसते.

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुणी तिला आलेला वाईट अनुभव सांगते, “नमस्कार, आता थोडासा विचार करण्यासाठी शांत ठिकाणी बसावं असं वाटतं. शनिवारवाड्याजवळ येऊन बसले होते. मी आणि माझ्या दोन मैत्रीणी आम्ही असं बसलं होतो आणि बसल्यानंतर आमच्यासमोर दोन मुलं येऊन बसली. ते एकटक आमच्याकडे सतत बघत होते. इतकं अस्वस्थ वाटत होतं की बास रे बास. आम्ही पाच मिनिटे शांत बसलो. दहा मिनिटे शांत बसलो. मुलं एकमेकांबरोबर हसताहेत, बोलताहेत आणि सतत आमच्याकडे बघताहेत. इतका राग येत होता. पहिली गोष्टी अशा गोष्टी सहनच करू शकत नाही. मी सरळ सरळ उठले, थेट त्या पोरांजवळ जाऊन विचारलं, काय बघतोस म्हणून. “काय बघतोस, काय समस्या आहे तुला सांग” पोरगा गप्प बसला. त्याला वाटलं पोरगी काहीतरी बोलेल आणि निघून जाईल वैगरे. सरळ चप्पल काढली आणि हातामध्ये घेतली. पोराला तिथेच समजलं, इथे काही खरं नाही आपलं म्हणून. तिथे लगेच वॉचमन आले आणि त्या पोरांना म्हणाले, पोरा हा महाराष्ट्र आहे, इथल्या पोरी हे सहन करणार नाही. मग नंतर तो मुलगा माफी मागून निघून गेला.”

तरुणी पुढे सांगते, “मुलींनो, जेव्हा अशी परिस्थिती येईल ना, तेव्हा स्टँड घ्यायला शिका. तुम्ही तिथून निघून जाऊ नका. आजूबाजूला अशी बरीच लोक असतात. आपल्या महाराष्ट्रात आणि पुण्यात अशी खूप लोक आहेत, जे लगेच तुमच्या मदतीला येतील. लगेच तेथील दोन तीन मुले येऊन उभी राहीली मदत करण्याच्या हेतूने. म्हणून मला सांगायचं असं आहे की स्टँड घ्या, मागे फिरू नका. जे चूक आहे ते चूक आहे, जे बरोबर आहे, ते बरोबर आहे.”सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओ

या तरुणीने sayali_dhanabai या तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मुलींनो स्वतः साठी stand घ्यायला शिका”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खुप छान आहे सायली ताई तू.. अशा लोकांना असाच धडा शिकवला पाहिजे सगळ्या मुलींनी” तर एका युजरने लिहिलेय, “सायली ताई खूप छान काम केलं…..” आणखी एका युजरने लिहिलेय, “अशा मुलींचा आणि ताईंचा आम्हाला सार्थ अभिमान आहे जय जिजाऊ जय शिवराय” अनेक युजर्सनी तरुणीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.