Viral Video : आईचं प्रेम हे जगावेगळं असतं. या नात्यात एक काळजी, जिव्हाळा आपुलकी असते. आईला फक्त जन्म देणाऱ्या मुलांविषयी जिव्हाळा नसतो तर त्याबरोबर ती इतर मुलांविषयी तितकीच आपुलकी दाखवते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक भारतीय आई अमेरिकन व्लॉगरला हाताने अन्न खाऊ घालत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही भावुक होईल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की कोलकाता येथील एका घरी एक अमेरिकन व्लॉगर आला आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की आई त्याला भाजीसह भात मिक्स करून देते. आणि विशेष म्हणजे या व्लॉगरला ती स्वत:च्या हाताने अन्न खाऊ घालते हे पाहून हा व्लॉगर खूप खूश होतो. त्यानंतर आई त्याला कसं हाताने खायचं हे सुद्धा शिकवते. पुढे अमेरिकन व्लॉगर म्हणतो की आज वेज डे आहे कारण आज गुरूवार आहे.” हा व्हिडीओ पाहून कोणीही भावुक होईल. या आईने या परदेशी तरुणाला अन्न खाऊ घालून “अतिथि देवो भव” चा खरा अर्थ सांगितला आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
dustincheverier या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “भारतीय आई मला लहान मुलांप्रमाणे खाऊ घालत होती.” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “जेव्हा आई खाऊ घालते, तेव्हा आपण पोटभरून जेवतो” तर एका युजरने लिहिलेय, “फक्त भारतीय आईच हे करू शकतात.” आणखी एका युजरने लिहिलेय, “भावा तू खूप नशीबवान आहे. तुला आई अन्न भरवते.” एक युजर लिहितो, “
ती तुला फक्त अन्न खाऊ घालत नाहीये, तर ती तिचे प्रेम, आपुलकी देखील देते. अगदी स्वतःच्या मुलाची काळजी घेणाऱ्या आईप्रमाणे ती तुला हळूहळू खा, असे म्हणते. किती नशीबवान माणूस आहेस तू” तर एक युजर लिहितो, “मी ३० वर्षांचा आहे, तरीसुद्धा आई मला भरवते” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमजो शेअर केले आहेत. काही युजर्सनी भारतीय आईंविषयी सांगितले आहे तर काही लोकांनी त्यांचे अनुभव शेअर केले आहेत.