Viral Video : सिंहगड हा पुणे शहराच्या सर्वात जवळचा किल्ला आहे. पूर्वी हा किल्ला कोंढाणा या नावाने ओळखला जायचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी तानाजी मालसुरे यांच्या नेतृत्वाखाली सैन्याची तुकडी पाठवली होती. या लढाईत तानाजी मालसुरे वीरमरण आले होते पण किल्ला जिंकला होता. ‘गड आला पण सिंह गेला’ हे वाक्य तुम्ही इतिहासात ऐकले असेल. तानाजी मालसुरे यांच्या स्मरणार्थ या किल्ल्याचे नाव सिंहगड असे ठेवण्यात आले.
दरदिवशी हजारो लोक सिंहगडाला भेट देतात. अतिशय लोकप्रिय पर्यटन स्थळ असल्याने आणि पुणे मुंबई पासून अगदी जवळ असल्याने पर्यटक येथे गर्दी करतात. वीकेंडला तर भयानक गर्दी पाहायला मिळते. सध्या पावसाळा सुरू आहे. पावसाळ्यात हिरवा निसर्ग अनुभवण्यासाठी लोक घराबाहेर पडताना दिसत आहे. उंच गडकिल्ल्यांवरून निसर्गाचे सौंदर्य आणखी खुलून उठते. त्यामुळे पावसाळ्यात अनेक जण सिंहगडाला आवर्जून भेट देतात.
सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ या वीकेंडचा आहे. व्हिडीओत तुम्हाला गडावर मरणाची गर्दी दिसून येईल. ही गर्दी पाहून कोणालाही संताप येईल. लोकांना चढायला आणि उतरायला रस्ता नाही. हळू हळू लोक चढताहेत आणि उतरताहेत. एवढ्या भयंकर गर्दीत चेंगराचेंगरी होण्याची शक्यता असते किंवा लहानशा एका चुकीमुळे एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
pps_vlog या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “सिंहगडावर भयंकर गर्दी आहे. वीकेंडला आता घराबाहेर पडू नका”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खरं आहे, अतिउत्साही लोक जातात पावसाळ्यात” आणखी एका युजरने लिहिलेय, “काही घडलं तर सरकारला दोष का देता?” एक युजर लिहितो, “यांना कितीही सांगा, काहीही फायदा नाही. हे लोक सुधारणार नाही.” तर एक युजर लिहितो, “लोकांना कसं कळत नाही, घरी बसा की कुटुंबाबरोबर भजी खात” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी संताप व्यक्त केला आहे.