Viral Video : कला म्हणजे मानवी कौशल्याद्वारे व्यक्त करणारी गोष्ट. असं म्हणतात कलेशिवाय माणूस जगू शकत नाही. मग ती कला कोणतीही असो, आपल्यामध्ये असलेली कला ओळखणे आणि त्यावर काम करणे महत्त्वाचे आहे. माणसाच्या आयुष्यात कलेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कलेमुळे माणसाला भावनिक आधार मिळतो पण काही कला अशा असतात ज्या फक्त कलाकाराच भावनिक आधार देत नाही तर इतरांना सुद्धा भावनिक आधार देण्याची ताकद ठेवतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक कलाकार कष्टकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू फुलवत आहे. हा कलाकार नेमका काय करतो. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पाहावा लागेल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुण चित्रकार दिसेल. जो सहज कोणाचाही चेहरा कागदावर रेखाटू शकतो. त्याची ही कला अनेकांच्या चेहऱ्यावर अचानक येणाऱ्या हास्याचे कारण ठरते. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की तो काही कष्टकऱ्यांचे चित्र काढतो आणि हे चित्र पाहून त्या कष्टकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य येते.
व्हिडीओच्या सुरुवातीला तुम्हाला दिसेल की चित्रकार फूड सेंटरमध्ये बसलेला असतो तिथे गाड्यावर विक्रेत्याच्या हाताखाली काम करणारा एक तरुण त्यांनी ऑर्डर केलेले फूड आणून देतो. तितक्यात हा चित्रकार त्याच्या हातात कागद देतो. पांढरा प्लेन कागद हातात घेतल्यानंतर तो कागदाच्या दुसऱ्या बाजूला बघतो तर त्याला त्याचे चित्र दिसते आणि चेहऱ्यावरचे अचानक भाव बदलते. त्याच्या चेहऱ्यावर हास्य खुलते. तो हसत हसत मालकाजवळ जातो आणि त्याला सुद्धा हे चित्र दाखवतो. त्याचा आनंद गगनात मावेनासा असतो.

पुढे हा चित्रकार एका बस ऑपरेटरचे चित्र काढतो. तो खूप गंभीर हावभावासह बसजवळ उभा असतो. जेव्हा चित्रकार त्याला त्याचे चित्र दाखवतो,त्याचे क्षणात त्याच्या चेहऱ्यावर हास्य येते आणि तो त्याला मिठी मारतो. त्याच्याजवळ व्यक्त होण्यासाठी शब्द नसतात, तो एवढा आनंदी होतो.

पुढे हा चित्रकार बूट पॉलिश करणाऱ्या काकाचे चित्र काढतो. काका खूप गंभीरपणे बूट पॉलिश करण्यात मग्न असतात पण जेव्हा चित्रकार त्यांच्याजवळ जातो आणि त्यांच्या हातात कागद देतो तेव्हा त्यावर स्वत:चे चित्र पाहून काकांच्या चेहऱ्यावर हास्य येते. काकाचा मूड सुधारतो आणि ते खूप खूश होतात.

पुढे चित्रकार मोमोजचा गाडा चालवणाऱ्या विक्रेत्याचे चित्र काढतो. तो त्याच्या कामात खूप मग्न असतो. त्याच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नसतो. पण जेव्हा चित्रकार त्यांना त्यांचे चित्र दाखवतो तेव्हा अचानक त्यांच्या चेहऱ्यावर हसू येते. त्यांच्या शेजारी उभी असलेली महिला (कदाचित त्यांची पत्नी असावी) त्या सुद्धा खळखळून हसायला लागतात. क्षणात त्या दोघांच्याही चेहऱ्यावर आलेले हसू पाहून कोणीही थक्क होईल.

व्हिडीओत तुम्हाला उसाच्या रसाचा गाडा चालवणारा विक्रेता दिसेल. तो त्याच्या कामात मग्न असतो पण जेव्हा चित्रकार त्याचे चित्र काढून त्याला दाखवतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा असतो.

त्यानंतर चित्रकार एका कॅफेमधील वेटरचे चित्र काढतो. जेव्हा चित्रकार त्याला चित्र दाखवतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचे गंभीर भाव हास्यात बदलतात. तो खूप जास्त खूश होतो आणि चित्रकाराशी हात मिळवतो.

आपल्या आजुबाजूला असे अनेक कष्टकरी लोक असतात जे त्यांच्या कामात इतके गुंतले असतात, की त्यांना क्षणभर विश्रांती सुद्धा घेता येत नाही. अशा कष्टकरी लोकांच्या चेहऱ्यावर हा चित्रकार त्याच्या कलेद्वारे हसू आणतो.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

या चित्रकार तरुणाचे नाव अभिनव जाधम आहे आणि त्याने त्याच्या abhinav_arts या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने यापूर्वी सुद्धा असे अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “गंभीर चेहरे कसे हास्यामध्ये बदलतात..” तर एका युजरने लिहिलेय, “व्हिडीओ पाहून भावुक झालो. तु तुझी कला किती सुंदररित्या वापरत आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “किती टॅलेंटेड कलाकार आहे जो चेहऱ्यावर हसू आणतो” अनेक युजर्सनी या तरुणावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.