धक्कादायक! क्रूर शिक्षकाने विद्यार्थ्याला इतकी मारहाण केली की शेवटपर्यंत Video पाहणंही अशक्य

सध्या सोशल मीडियावर एक शिक्षक विद्यार्थ्याला बेदम मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात आरोपी शिक्षक या विद्यार्थ्याला हातातील लाकूड मोडेपर्यंत मारतो.

Beating
मारहाण (प्रतिकात्मक छायाचित्र)

सध्या सोशल मीडियावर एक शिक्षक विद्यार्थ्याला बेदम मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात आरोपी शिक्षक या विद्यार्थ्याला हातातील लाकूड मोडेपर्यंत मारतो. लाकूड मोडल्यानंतरही आरोपी शिक्षक थांबत नाही. तो हाताने थोबाडीत मारणे, बुक्के मारणे, केस ओढणे असेही प्रकार करतो. विद्यार्थ्याला इतकी क्रूरपणे मारहाण झाली आहे की पाहणाऱ्याला हा व्हिडीओ शेवटपर्यंत पाहणंही अशक्य होतं. हा व्हिडीओ बिहारची राजधानी पाटणामधील आहे.

पाटणामधील मसोडी येथील कोचिंग क्लासमध्ये हा मारहाणीचा प्रकार घडला आहे. आरोपी शिक्षकाचं नाव छोटू असं आहे. सुरुवातीला आरोपी शिक्षक लाकडाने विद्यार्थ्याच्या पार्श्वभागवर जोरजोरात फटके मारतो. यावेळी हा विद्यार्थी जीवाच्या आकांताने ओरडत रडतो. मात्र, त्यानंतही या शिक्षकाला दया येत नाही. तो त्या विद्यार्थ्याला उभं करून शरीराच्या मागच्या बाजूवर लाकडाने मारहाण करत राहतो. वेदनेने विद्यार्थी हात जोडतो तरीही हा क्रूर शिक्षक अमानुषपणे मारहाण करत राहतो. अखेर मारहाण होत असलेली लाकडाची फळी तुटते.

व्हिडीओ पाहा :

लाकडाची फळी तुटल्यानंतरही आरोपी शिक्षक या विद्यार्थ्याला मारहाण करायचं थांबत नाही. तो केस ओढत हाताने चापट, बुक्के मारत राहतो. अखेर विद्यार्थी जमिनीवर पडतो. जमिनीवर पडल्यावरही आरोपी शिक्षक विद्यार्थ्याला मारहाण करत राहतो.

यानंतर व्हिडीओ संपतो. मात्र, विद्यार्थी बेशुद्ध होईपर्यंत आरोपी शिक्षकाने मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर पीडित विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं. या घटनेनंतर संतापलेल्या नागरिकांनी आरोपी शिक्षकालाही चोप दिला.

हेही वाचा : या चिमुकलीचा जबरदस्त स्टंट पाहून व्हाल हैराण, नेटकऱ्यांचा पालकांवर संताप!

पोलिसांनी व्हायरल व्हिडीओची दखल घेत गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Video of teacher beating student viral on social media from bihar pbs

Next Story
‘खूप जागा आहे, जागा नाही…’ बसमध्ये सीटसाठी दोन जणांच्या भांडणाचा हा VIRAL VIDEO पाहा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी