Viral Video: संवेदना केवळ मानवांमध्येच नाही तर प्राण्यांमध्ये देखील असतात हे नेहमीच दिसून येते, विशेषत: जेव्हा ती आई असते. आईसाठी तिचे मूल ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. मुलाच्या भल्यासाठी आई काहीही करू शकते, जीवही पणाला लावू शकते. आई (Mother) मुलांसाठी कोणतही धोका पत्करून सर्वांशी लढू शकते. आईच्या संवेदना आणि प्रेम दर्शवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एक हत्तीण ( Elephant Mother) आपल्या मुलाला वाचवण्यासाठी एकामागून एक प्रयत्न करताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की काय झालं?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक हत्ती जंगलातून कसा बाहेर पडतो आणि रस्त्यावर येतो हे दिसत आहे. रस्त्याने जाणाऱ्या वाहनांना ती थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. ती तिच्या सोंडेने वाहनांना थांबण्याचा प्रयत्न करते हल्ला. त्याचवेळी या हत्तीणीला जंगलाच्या दिशेने हाकलण्यासाठी वनविभागाचे जवान फटाके फोडतात, मात्र हत्तीण पळण्याचे नाव घेत नाही. हत्तीनीच्या मागे जात असताना वनविभागाच्या लोकांना एक छोटा हत्ती पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडताना दिसतो, तेव्हा या लोकांना समजले की ही हत्तीन त्यांना काय सांगू पाहत आहे.

(हे ही वाचा: Viral Video: हवा भरतानाच जेसीबीचा टायरच फुटला अन्….; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद)

(हे ही वाचा: Video: चालकाने ऑटोरिक्षाच्या छतावरच बनवली बाग, गरमी पासून वाचवण्यासाठी केला देशी जुगाड)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

खड्ड्यात पडलेल्या हत्तीच्या बाळाला वनकर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्नानंतर बाहेर काढले. हत्ती खड्ड्यातून बाहेर येताच, मूल त्याच्या आईकडे धावले आणि आईलाही मुलाला भेटून खूप आनंद झाला. ते दोघे एकत्र जंगलाच्या दिशेने निघून गेले. या व्हिडीओला आतापर्यंत ३४ हजारांहून अधिक व्ह्यूज आले असून लोक या मातेला वंदन करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video of this elephant will win the heart such a trick was used to save her child ttg
First published on: 05-05-2022 at 12:49 IST