Viral Video : आणि कॅमेरासमोरच अँकरची जुंपली

सोशल मीडियावर व्हायरल

पाकिस्तानी टीव्ही अँकर्समध्ये झालेले भांडण समोर आले आहे. नशीबाने तेव्हा ते दोघेही ऑन एअर नव्हते. पण तरीही त्यांचे भांडण कॅमेरात कैद झाले आहे. विशेष म्हणजे कॅमेरात कैद झालेले हे क्षण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. हे दोन्हीही अँकर लाहोरमधील ‘सिटी ४२’ या चॅनलचे आहेत. त्यांचे हे भांडण अतिशय लहान मुलांच्या भांडणाप्रमाणे वाटत आहे.

यामध्ये पुरुष अँकर आपल्या प्रोड्यूसरशी बोलत असून मी या महिला अँकरसोबत बुलेटीन कसे करु, ती तर मला तिच्याशी बोलू नको असे म्हणत आहे. तेव्हा ही महिला अँकर उत्तर देते की मी विशिष्ट प्रसंगावरुन बोलू नको असे म्हटले. माझ्याशी नीट पद्धतीने बोल असे ती या पुरुष सहकाऱ्यांला सांगताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. यावेळी दोघेही एकमेकांशी नीट भाषेत बोलण्यावरुन वाद घालताना दिसत आहे. हिला आपल्या तोंडावर नियंत्रण ठेवायला सांगा, हे सगळे रेकॉर्ड होत असल्याचेही हा पुरुष अँकर महिला अँकरला सांगताना दिसतो. त्यानंतर हीचे नखरे कमी होत नाहीत असेही तो म्हटल्याचे ऐकू येते. यानंतर हा व्हिडिओ बंद होतो. हा सर्व संवाद हिंदी भाषेतील असून तो कॅमेरात कैद झालेला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Video of two pakistani anchors fighting in a newsroom has gone viral