उबर चालकासोबत घडला धक्कादायक प्रकार, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

दिसण्यावर जाऊ नका

गाडीत असलेल्या डॅश कॅमेरामध्ये चोरीचा प्रसंग कैद झाला आहे. (व्हिडिओ सौजन्य : MB TV/YouTube)

अनेकदा आपण उबर चालकांविषयी वाईट बातम्या ऐकतो. चालकाने महिलांसोबत अतिप्रसंग केला, प्रवाशांना शिवीगाळ किंवा मारहाण केली, प्रवाशांना लुटले अशा अनेक बातम्या काही उबर चालकांविषयी गेल्या वर्षभरात ऐकायला मिळाल्यात. पण न्यूयॉर्कमधल्या एका उबर चालकासोबत मात्र वेगळाच प्रकार घडला. प्रवासादरम्यान त्यालाच महिला प्रवाशांनी लुटून पळ काढल्याचे समोर आले आहे.

Viral : विमा कंपनीने मागितले फ्रंट- बॅक फोटो, तरुणीने चुकून पाठवले स्वत:चे फोटो

दोन महिला आणि एक पुरुष प्रवाशांना घेऊन तो चालला होता. त्याचं संपूर्ण लक्ष गाडी चालवण्याकडे होतं, त्यामुळे प्रवाशांचा मागे काय कट शिजत होता याची त्याला कल्पनाच नव्हतीच. जेव्हा चालकानं गाडी सिग्नलवर थांबवली तेव्हा महिला प्रवाशांनी त्याच्या ‘टिप बॉक्स’मध्ये असलेल्या पैशांवर डल्ला मारला, चालकाला काही समजायच्या आतच तिघांनी तिथून पळ काढला. गाडीत असलेल्या डॅश कॅमेरामध्ये चोरीचा प्रसंग कैद झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून ९ लाख २७ हजार लोकांनी तो पाहिला आहे.

Viral Video : ‘हे’ माकड खरंच पेट्रोल पितं?

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Video of uber rider was caught stealing money from the driver