पावसाळ्यात वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक धबधबा, नदी किंवा समुद्रावर भेट देतात. पावसाळ्यात धबधबा किंवा नदीच्या ठिकाणी भेट देणार्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला जातो तरीही काही लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि सेल्फी आणि रिल व्हिडिओच्या नादात आपला जीव गमावतात. काही दिवसांपूर्वीच 'रील' व्हिडीओमुळे प्रसिद्ध झालेल्या मुंबईतील अन्वी कामदारचा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात व्हिडिओ बनवताना खड्ड्यात पडून मृत्यू झाला. दरम्यान पुन्हा एकदा अशाच एका घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये रील व्हिडिओ बनवण्याच्या नादात तरुणाचा पाय घसरतो आणि जोरदार वाहणार्या पाण्याच्या प्रवाहात पडतो. हेही वाचा - Video : बाईक चोरण्यासाठी चोरट्याने लढवली शक्कल, बॅटिंग करता करता करणार होता चोरी, शेवटी असा फसला त्याचा डाव व्हिडिओमध्ये एक तरुण एका खडकावर उभा असलेला दिसत आहे. त्याच्यामागे पाण्याचा जोरदार प्रवाह वाहताना दिसत आहे. तरुण आपल्या मित्राला ओरडून विचारत आहे की, माझा आवाज येत आहे का? त्यावर व्हिडिओ शुट करणारा त्याचा मित्र म्हणतो, "मला कसे समजणार, मला येत आहे तर व्हिडीओमध्ये पण येत असेल." त्यानंतर तो पुढे खडकावर उभा असलेला तरुण काहीतरी सांगणार त्याआधीच त्याचा पाय घसरतो आणि तो समोरील जोरदार पाण्याच्या प्रवाहात पडताना दिसतो. पाण्याचा प्रवाहा इतका जोरात असतो तरुण त्यात दिसत नाही. तरुणाचा पाय घसरताच व्हिडिओ शूट करणारा व्यक्तीही जोरात ओरडताना ऐकू येतो. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या काळजात धस्स होत आहे. हेही वाचा - “हे लोक सुधारणार नाही”, समुद्राची लाट जोरात आली अन् क्षणात वाहून गेले किनाऱ्यावरील लोक, थरारक Video Viral सोशल मीडियावर पोस्ट केलेला हा व्हिडीओ दिशाभूल करणारा आहे कारण हा व्हिडीओ अर्धा पोस्ट केला आहे. आकाश सागर असे या तरुणाचे नाव असून त्याने तो सुखरुप आहे. या तरुणाने Akash Sagar नावाच्या पेजवर आपला पूर्ण व्हिडीओ पोस्ट करून तो सुखरुप असल्याचे सांगितले आहे. व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसते की तो पोहत लगेच प्रवाहाच्य बाहेर पडतो. हा व्हिडीओ २०२३ मधील असून सध्या पुन्हा चर्चेत आला आहे. हेही वाचा - Video : बाईक चोरण्यासाठी चोरट्याने लढवली शक्कल, बॅटिंग करता करता करणार होता चोरी, शेवटी असा फसला त्याचा डाव व्हिडीओवर अनेकांनी कमेंट देखील केल्या आहेत. एकाने कमेंट करून म्हटले की,"तो वाचला आहे पूर्ण व्हिडिओ बघा" दुसरा म्हणाला, "रील स्टंटचे व्हिडिओ बनवण्यासाठीच अद्दल घडली" तिसरा म्हणाला,"असा मुर्खपणा करू नका" सुदैवाने या अपघातामधून हा तरुण वाचला असला तरी धबधब्यासारख्या ठिकाणी भेट दिल्यानंतर सतर्क राहण्याचे आवाहन केले जाते.