Video: १०५ वर्षांच्या आजी पद्मश्री पुरस्कार स्वीकारण्यासाठी जात असताना पंतप्रधान मोदींनी…

राष्ट्रपती रामनाथ कोविंद स्वत: स्टेजवरुन खाली उतरुन त्यांना पुरस्कार प्रदान करण्यासाठी पुढे आल्याचं चित्र पहायला मिळालं.

Padma Shri to Smt Rangammal for Agriculture PM Modi bows down in respect
कृषी क्षेत्रातील योगदानासाठी देण्यात आला पुरस्कार

भारत सरकारकडून प्रदान करण्यात येणाऱ्या पद्म पुरस्कारांचा वितरण सोहळा नुकताच पार पडला. सरकारच्या वतीने राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात येणाऱ्या पद्म पुरस्कार सोहळ्याचा दुसरा टप्पा ९ नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती भवानमधील दरबार हॉलमध्ये झाला. या सोहळ्यामध्ये मागील काही वर्षांपासून सामान्यातील असामान्य म्हणजेच लोकांचे पद्म पुरस्कार विजेत्या या पद्धतीने पुरस्कार दिले जात आहेत.

स्वत:चं आयुष्य असाच एखाद्या समाजउपयोगी कामासाठी किंवा एकाद्या क्षेत्रासाठी खर्च करणाऱ्या नामावंतांचा गुणगौरव सोहळा मोठ्या थाटात पार पडला. पण या सोहळ्यामध्ये एका १०५ वर्षांच्या आजींनाही पुरस्कार प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्या व्हीलचेअरवरुन आल्या तेव्हा सभागृहामध्ये उपस्थित असणारे उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांना अभिवादन केलं. इतकचं नाही तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद स्वत: स्टेजवरुन खाली उतरुन त्यांना पुरस्कार प्रदान करण्यासाठी पुढे आल्याचं चित्र पहायला मिळालं.

हा पुरस्कार पटकावण्याच्या आजींचं नाव आहे नाव रंगममाल पपममाल. त्या मूळच्या तामिळनाडूच्या असून कृषी क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर त्यांना व्हीलचेअरवरुन मुख्य मंचाकडे नेण्यात आलं. तेव्हा पंतप्रधान मोदींसमोरुन जाताना त्यांनी आधी हात पुढे केले आणि त्यानंतर मान्यवरांना नमस्कार करत त्यांना अभिवादन केलं. मोदींनीही नमस्कार करुन मान खाली घालत रंगममाल यांना नमस्कार केला.

पंतप्रधान मोदी यापूर्वीही रंगममाल यांना भेटले असून त्यावेळीही त्यांनी अशाप्रकारे वाकून त्यांना अभिवादन केलं होतं. मोदींनी देशातील सर्वोच्च पदावर असतानाही वयस्कर पुरस्कार विजेत्याबद्दल दाखवलेला हा अनोखा सन्मान सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Video padma shri to smt rangammal for agriculture pm modi bows down in respect scsg

Next Story
video : रक्तस्त्राव ‘तिला’ रोखू शकत नाही !
ताज्या बातम्या