Leopard Viral Video: भारत- पाकिस्तानची सीमा म्हंटली की सदैव तत्पर असणारी सैन्याची तुकडी, भीतीचे वातावरण, कडेकोट सुरक्षा असे एक दृश्य डोळ्यासमोर येते. असं असलं तरी अनेकदा व्हायच्या तो गोष्टी होतातच. तुम्हाला सलमान खानच्या बजरंगी भाईजान सिनेमातील सीमा पार करण्याचा सीन आठवत असेल ना? मुन्नीला सोडायला भाईजान कसा भुयार करून भारत- पाकिस्तान सीमा ओलांडतोय हे यामध्ये दाखवलं होतं. आताही तसाच काहीसा प्रकार घडला आहे पण यावेळी भाईजान नव्हे तर चक्क एक पाकिस्तानमधील बिबट्या भारतात शिरला आहे. बिबट्याची ही घुसखोरी CCTV कॅमेऱ्यात कैद झाली. यासाठी बिबट्याने लढवलेली शक्कल पाहून नेटकरीही अवाक झाले आहेत. Video: बिबट्याने लढवली भन्नाट शक्कल ANI च्या वृत्तानुसार १८ मार्च रोजी संध्याकाळी ७ च्या सुमारास भारत-पाकिस्तान सीमेवरील सांबा जिल्ह्यातील रामगढ उप-सेक्टरमध्ये हा बिबट्या पाहायला मिळल होता. दोन्ही देशांच्या सीमेवरील तारेचे काटेरी कुंपण पार करून हा बिबट्या भारतात आला. मुळात त्याने एवढा धोका का पत्करला असावा असाही प्रश्न आहेच. प्राथमिक अंदाजानुसार भूक लागल्याने अन्नाच्या शोधात बिबट्या निघाला असावा असे समजत आहे. थक्क करणारी बाब म्हणजे हा बिबट्या तारेखालून भारतात शिरला. https://twitter.com/ani/status/1637128079507181572?s=46&t=CqM9YdCR8eucEWr-aBL7fA हे ही वाचा<< पाटणा रेल्वे स्टेशनवर पॉर्न लागल्यावर पॉर्नस्टारचे ‘ते’ ट्वीट चर्चेत! म्हणते, “माझी इच्छा आहे की…” ही घटना सीमेवरील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली. आणि आता हा व्हिडीओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. या बिबट्याला पाहून नेटकरी विविध कमेंट्स करत. काहींनी या पाकिस्तानी बिबट्याचं स्वागत केलंय, तर काहींनी बघा बाबा बिबट्याची नीट चौकशी करून, तपासून घ्या असा सल्ला दिलाय. माणसं जाऊदे पण आता प्राण्यांना सुद्धा पाकिस्तानात राहायचं नाही अशी टोमणेबाजी सुद्धा नेटकऱ्यांकडून सुरु आहे.