एखाद्या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी लोकांनी राजकीय नेत्यांना आमंत्रित करणे हे काही नवीन नाही. उद्घाटन म्हंटल की, कात्रीने बांधलेली रिबीन कापायची एवढ साध सरळ काम. पण एका पाकिस्तानातील मंत्र्याने अलीकडेच एका दुकानाच्या उद्घाटन समारंभाला गेले असता हटके स्टाईलने रिबीन कापली. त्यांनी चक्क दाताने रिबीन कापली.आता, या घटनेच्या व्हिडीओने इंटरनेटवर वादळ उठवले आहे, अनेक नेटीझन्स या घटनेमुळे त्यांची थट्टा करत आहेत.

काय झालं नक्की?

कारागृह मंत्री आणि पंजाब सरकारचे प्रवक्ते फय्याज-उल-हसन चोहान यांना गुरुवारी त्यांच्या रावळपिंडी मतदार संघातील इलेक्ट्रॉनिक्स दुकानाच्या उद्घाटनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. तथापि, त्यांनी कात्रीने रिबीन कापण्याचा प्रयत्न केला, जो नियोजनाप्रमाणे झालाच नाही. काही वेळ प्रयत्न केल्यानंतर, त्यांनी दाताने रिबीन कापण्याचा प्रयत्न केला. हे बघून उपस्थितानमध्ये एकच हशा पिकला हे व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.

स्वतः शेअर केला व्हिडीओ

मंत्र्यांनी स्वतः व्हिडीओ शेअर केला आणि त्यांनी तशा पद्धतीने का कापली हे स्पष्ट केले. “कात्री बोथट आणि वाईट होती” असं लिहित पुढे म्हणाले की, “मालकाने दुकानाला लाजिरवाण्या प्रकारापासून वाचवण्यासाठी नवीन विश्वविक्रम केला”.

नेटीझन्सच्या प्रतिकिया

क्लिप व्हायरल होताच, काहींनी विनोदी तुलना केली तर काहींनी मंत्र्याला ट्रोल केले. अवघ्या २१ सेकंदाच्या या व्हिडीओला आत्तापर्यंत जवळ जवळ ५० हजार लोकांनी बघितलं आहे. ५०० पेक्षा अधिक लोकांनी व्हिडीओ रीपोस्ट करत व्हिडीओ व्हायरल केला आहे. तर अनेकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत.

तुमचं काय मत आहे या व्हिडीओवर?