3 Idiots Viral Video: २००९ ला प्रदर्शित झाल्या ३ इडियट्स सिनेमाची क्रेझ अजूनही कायम आहे. आजवर बॉलिवूडने दाखवलेल्या फॅन्सी कॉलेजच्या आयुष्याला सत्याचा आरसा दाखवणारा हा चित्रपट होता. राजकुमार हिरानी यांच्या थ्री इडियट्सने केवळ प्रेक्षकांच्या मनावरच नव्हे तर बॉक्स ऑफिसवरही राज्य केले म्हणायला हरकत नाही. केवळ कथानकच नव्हे तर आमिर खान, शर्मन जोशी, आर माधवन आणि इतरांनी दिलेल्या उत्कृष्ट अभिनयासाठीही हा चित्रपट लक्षात ठेवला जातो. अलीकडेच, फरहान कुरेशीच्या भूमिकेसाठी आर माधवन ऑडिशन देत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात आर माधवनचा तब्बल १४ वर्षांपूर्वीचा चेहरा व निव्वळ शुद्ध अभिनय पाहून नेटकरी खुश झाले आहेत.

विधू विनोद चोप्रा फिल्म्सच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये, आर माधवन त्याच्या व्यक्तिरेखेचा एक मोनोलॉग सादर करताना दिसतो. तुम्ही चित्रपट पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल हा सीन फरहान कुरेशी त्याच्या वडिलांना इंजिनिअरिंग ऐवजी वाईल्ड लाईफ फोटोग्राफर बनण्याची इच्छासांगतो.अभिनेत्याच्या ऑडिशनची ही झलक पाहूनचाहते अगदी भारावून गेले आहेत.

helicopters, Lok Sabha election 2024, latest news, marathi news
प्रचारासाठी उसंत, तरीही हेलिकॉप्टरची संख्या कमीच
Accused kidnap minor girl
अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला बिहारमध्ये अटक
Sonam Wangchuk
लेख: लडाखवासींची लोककेंद्री विकासासाठी हाक
Harsh Chhaya on divorce with shefali shah
घटस्फोटानंतर २४ वर्षांनी शेफाली शाहचा पहिला पती म्हणाला, “आम्ही कधी एकमेकांसमोर आलो तर…”

3 Idiots: आर माधवन व्हायरल व्हिडीओ

थ्री इडियट्स रिलीज होऊन आता १३ वर्ष होऊन गेली आहेत पण अजूनही यातील प्रत्येक पात्र अगदी मिलीमीटर पासून ते व्हायरस ते अगदी चतुर रामलिंगाम पर्यंत प्रत्येक जण प्रेक्षकांच्या ध्यानी मनी आहे.

हे ही वाचा<< मुंबई लोकलमध्ये ‘ती’ माईक व स्पीकर घेऊन चढली; प्रत्येक शब्दाला उंचावल्या प्रवाशांच्या भुवया, Video पाहा

दरम्यान, ३१ जानेवारी रोजी हा व्हिडीओ शेअर करण्यात व्हिडिओला २२ लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकजण या चित्रपटातील त्यांच्या आवडत्या डायलॉग्ससह कमेंट करत आहे. या सिनेमाचा त्यांच्या आयुष्यावर झालेल्या परिणामांची आठवण करून देत आहेत.