CSK vs GT Brutal Fights: चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील बहुप्रतिक्षित आयपीएल २०२३ ची अंतिम फेरी पावसामुळे कालच्या दिवसापुरती रद्द झाली होती. आयपीएल १६ व्या हंगामाच्या अंतिम विजेतेपदाचा निर्णायक सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होणार होता, परंतु पावसाने सामना सुरु व्हायलाच खूप उशीर झाला अगदी रात्री ९.१५ वाजेपर्यंतही नाणेफेक होणे बाकी होते.
हजारो चाहते फायनल सुरू होण्याची प्रतीक्षा करत असताना, रविवारी (२८ मे) अहमदाबादमधील नरेंद्र मोदी
तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, ही महिला अधिकाऱ्याला हिंसकपणे ढकलताना दिसत आहे. तरीही हा पोलीस अधिकारी शांतपणे महिलेला शाब्दिक समज देण्याचा प्रयत्न करत आहे पण या महिलेने अगदी मर्यादा सोडून चार ते पाच वेळा या अधिकाऱ्यावर हल्ला केला, त्याला ढकलून दिलं, कानाखाली मारलं. हा अधिकारी खुर्च्यांच्या अरुंद रांगेतून खाली पडल्याचेही दिसत आहे. यावेळी आजूबाजूला असणारे सर्वचजण थक्क झाले होते. काहींनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण त्या महिलेचा चढलेला पारा पाहता सर्वच घाबरून गेले होते.
Video: CSK vs GT वेळी महिला व पोलीसांमध्ये तुफान राडा
हे ही वाचा<< धोनी व पांड्याच्या फॅन्सला विराट कोहलीचा मोठा आधार; स्टेडियममध्ये भरपावसातील ‘तो’ Video पाहून व्हाल खुश
दरम्यान हा व्हिडीओ ट्वीट केलेल्या व्यक्तीच्या माहितीनुसार, या महिलेला मैदानातून बाहेर काढण्यात आले होते. दुसरीकडे आज २९ मे २०२३ ला संध्याकाळी ७. ३० ला नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएलचा अंतिम सामना पार पडणार आहे.
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.