Ramabai Ranveer Marathon Story : महाराष्ट्रातील बिड जिल्ह्यातील एका आईचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका गावातील साधी महिला पण आपल्या लेकरांसाठी तिने जे केलं त्याचं कौतुक करावे तितकं थोडे. वयाच्या ४७ व्या वर्षी ही महिला लेकीच्या शिक्षणासाठी अनवानी पायांनी धावली आणि स्पर्धा जिंकली. या आईची इच्छाशक्ती आणि जिद्दीला नेटकऱ्यांनी सलाम केला आहे.
अंबाजोगाईला राहाणारी रमाबाई रणवीर शहरात एक अॅकडमीमध्ये जेवण बनवण्याचे काम करत आहे. मुंबईमध्ये एक दुर्घटनेमध्ये पतीचा मृत्यू झाल्यानंतर आपल्या दोन मुलींना सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर पडली. बिकट आर्थिक स्थिती असूनही त्यांनी संकल्प केला की आपल्या मुलींना चांगले शिक्षण द्यायचे.
रमाबाईने आपल्या मोठ्या मुलीला एका अॅकडमीमध्ये भरती केले आणि त्या स्वंयपाक करण्याचे काम करतात. त्या रोज हेच काम करतात आणि स्पर्धा परिक्षेची तयारी करतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
चप्पल हातात घेऊन धावली आई (Mother ran with slippers in hand)
दरम्यान एका स्थानिक सस्थेने अमृत दौड मॅरेथॉन आयोजित केली ज्यासाठी पहिल्या क्रमांकाला ३००० रुपये बक्षीस जाहीर केले होते. रमाबाई फक्त ३००० रुपयांसाठी या स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. ट्रकसूट घातलेल्या तरुण स्पर्धकांबरोबर खांद्याला खांद्या लावून नेहमीच्या साडीमध्येच रमाबाई स्पर्धेत सहभागी झाल्या. पण मॅरथॉन सुरु झाल्यानंतर त्या घसरू लागल्या. धावताना त्यांच्या पायातील चप्पल निसटत होती शेवटी चप्पल हातात घेऊन त्या अनवाणी धावल्या. रस्त्यावरील छोट्या छोट्या दगड पायांना टोचत होते तरी त्या थांबल्या नाही. साडी सांभाळून त्या धावत राहिल्या आणि सर्व स्पर्धकांना अखेर त्यांनी मागे टाकले. शेवटी रमाबाई स्पर्धेत जिंकल्या आणि प्रथम क्रमांचे बक्षीस मिळवले. तिथे उपस्थित प्रेक्षकांनी देखील त्यांची जिद्द पाहून त्यांचे कौतुक केले आणि त्यांच्या हिंमतीची दाद देत त्यांचा उत्साह वाढवला.
आपल्या विजयाबाबत सांगताना रमाबाई यांनी सांगितले की, कित्येक महिला या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या पण त्यांनी बक्षीस मिळवण्याचा दृढ निश्चय केला होता. त्यांनी सांगितले की, धावताना त्यांना आपल्या मुलींचे भविष्य दिसत होते. त्यांनी स्पर्धेक जिंकलेल्या ३००० रुपयांमधून मुलींसाठी पुस्तके विकत घेण्याचा विचार केलाहोता. त्यांची मुलगी पुजाने देखील स्पर्धेत सहभाग घेतला होता आणि ती दुसऱ्या क्रमांकावर आली. तिने सांगितले की, तिने तिच्या आईला स्पर्धेत सहभागी होण्यासीठ प्रोत्साहन दिले होते पण तिला कल्पना नव्हती की तिची आई पहिल्या क्रमांक पटकावेल.
पुजाने सांगितले की तिच्या आईने बिकट परिस्थिती असूनही तिच्या बहिणींना सांभळताना कधीही हार मानली नाही. पुजा आता पोलिस भरतीची तयारी करत आहे आणि पोलिस ऑफिसर होण्याचे स्वप्न बघते. तिची बहीण बँकिंग परीक्षेची तयारी करत आहे. कुटुंब आधी शेतीवर अवलंबून होते. पण आपल्या लेकींची स्वप्न पुर्ण करण्यासाठी रमाबाई यांनी अकॅडमीमध्ये स्वंयपाकाचे काम सुरु केले.
पुजाची मेहनत पाहून अकॅडमीचे डायरेक्टरने त्यांची फी देखील माफ केली होती. रमाबाई रणवीर यांनी मॅरेथॉनमधील विजय हा फक्त एका स्पर्धेपेक्षा खूप मोठी गोष्ट होती. आपल्या लेकींच्या शिक्षणासाठी दिवसभर किचनमध्ये काम केल्यानंतर अनवाणी धावल्या आणि जिंकलेल्या पैशातून त्यांनी पुस्तकांसाठी लागणारे पैसे खर्च केले.
