scorecardresearch

Video: शिवनेरीवर रंगला शिवजन्मोत्सव सोहळा; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गायला छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा

Shiv Jayanti 2023: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या शिवजन्मोत्सव सोहळ्याचे व्हिडीओ शेअर केले आहेत

Video Shiv Jayanti 2023 Shivneri Shivjanmotsav Sohala Live CM Eknath Shinde Artist Sing Shivaji Maharaj Palna
Video: शिवनेरीवर रंगला शिवजन्मोत्सव सोहळा (फोटो: ट्विटर)

Shiv Jayanti 2023 : आज राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे. किल्ले शिवनेरीवरही मोठ्या प्रमाणात शासकीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थिती होती. शिवजन्मोत्सवाची सुरुवात शिवनेरी किल्ल्यावरून झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बाळ शिवाजींना पाळण्यात घालण्यात आले. देवेंद्र फडणवीस सुद्धा याठिकाणी उपस्थित होते. नऊवारी नेसलेल्या कलाकारांनी यावेळी शिवरायांचा पाळणा गायला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या शिवजन्मोत्सव सोहळ्याचे व्हिडीओ शेअर केले आहेत. सुंदर फुलांच्या सजावटीत, पारंपरिक पद्धतीने अगदी विधिवत हा शिवजन्मोत्सवाचा सोहळा पार पडला, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व फडणवीस या दोघांनीही पारंपरिक पगडी परिधान केली होती.

शिवनेरीवरील शिवजन्मोत्सव सोहळा लाईव्ह

हे ही वाचा<< Shiv Jayanti 2023: छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा तुमच्या भाषेत समजून घ्या, पाहा नेमका अर्थ

दरम्यान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याने अनेकांना गडावर जाण्यापासून थांबवण्यात आले होते. यावरून संभाजीराजे छत्रपती यांनी नाराजी व्यक्त केली आहे, जोपर्यंत शिवप्रेमींना गडावर सोडत नाही तोपर्यंत आपणही गडावर जाणार नाही असेही छत्रपती म्हणाले. यावर उत्तर देताना फडणवीस यांनी पुढच्या वर्षी अधिक उत्तम नियोजन करू जेणेकरून शिवप्रेमींना त्रास होणार नाही अशी ग्वाही दिली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-02-2023 at 10:17 IST

संबंधित बातम्या