Viral Video: दुर्लक्ष करणे हा माणसाचा स्वभाव अनेकदा स्वतःसह इतरांना सुद्धा मृत्यूच्या दाराशी घेऊन जातो. आजपर्यंत अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच प्रत्यक्ष सुद्धा वाहतूक पोलीस वाहने चालवताना काय खबरदारी घ्यावी याविषयी सांगत असतात. पण आपल्यातीलही काही अतिउत्साही लोक या सूचनांकडे दुर्लक्ष करतात. अनेकदा तर या सूचनांवर मीम्स बनवून सुद्धा व्हायरल केले जातात. हा निष्काळजीपणा नडल्याचे उदाहरण सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एका ट्रकला बांधलेली दोरी गळ्यात अडकून एक तरुण चक्क चालत्या बाईकवरून खाली कोसळल्याचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

प्राप्त माहितीनुसार, तामिळनाडूतील थुथुकुडी येथे हा भयंकर व विचित्र अपघात घडल्याचे समजतेय. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती.
अपघातग्रस्त तरुण हा थुथुकुडी जिल्ह्यातील श्रीवैकुंटम शहरातील रहिवाशी असून त्याचे नाव मुथू असे आहे. कामावर जाताना बाईकवरून निघालेल्या मुथूची बाईक अचानक भररस्त्यात मागे खेचली गेली व तो बाईकवरून मागच्या बाजूने खाली पडला. अचानक नेमकं काय झाल हे कोणाच्याच लक्षात आलं नाही. तरीही आजूबाजूच्या पादचाऱ्यांनी मुथूची मदत केली.

Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
challenge to the forest officials to find the tigress dropped radio collar
नागपूर : ‘रेडिओ कॉलर’ निघाली; ‘त्या’ वाघिणीचा शोध घेण्याचे वनाधिकाऱ्यांपुढे आव्हान
demolition of seven bungalows became controversial
विश्लेषण : सात बंगल्यातील पाडकाम वादग्रस्त का ठरले? मजबूत वास्तू धोकादायक घोषित करण्यामागे पालिका-विकासकांचे साटेलोटे?
Indiscriminate firing in nagpur by criminal over money of MD
नागपुरात एमडीच्या पैशावरून गुन्हेगाराचा अंधाधुंद गोळीबार, कुख्यात टोळ्या पुन्हा…

नेमका प्रकार समजून घेण्यासाठी स्थानिक वाहतूक पोलिसांनी जवळचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता अपघाताचे कारण समजले. मुथू इरळ परिसर ओलांडत असताना नेमक्या त्याच क्षणी समोरच्या बाजूने खताची वाहतूक करणारा ट्रक भरधाव येत होता. ट्रकच्या भारावर बांधलेला दोरीचा गळ मुथूच्या गळ्यात अडकला आणि त्यामुळे तो बाईकवरून खाली खेचला गेला.

भररस्त्यात बाईक मागे खेचली, ‘ती’ गळ्यात पडली अन्…

हे ही वाचा<< Video: शेवटी ‘तो’ सापच आहे..मालकाने अजगर उचलला अन् आक्रीत घडलं, कुटुंबाच्या डोळ्यासमोरच पूर्ण..

दरम्यान, लोकांच्या सतर्कतेने मुथुचा जीव वाचला व सुदैवाने मुथू किरकोळ जखमी होऊन बचावला. इरळ पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे