Snake Video: देवाची करणी आणि नारळात पाणी ही म्हण आपणही ऐकली असेल. निसर्गाची जादू कधी कधी आपल्याला विचारही करता येणार नाही अशा पद्धतीने थक्क करते. उदाहरण द्यायचं तर सरडा कसा रंग बदलतो याविषयी कितीही संशोधन झाले असले तरी प्रत्यक्ष असं घडताना पाहणं याचे सगळ्यांनाच अप्रूप वाटतं. निसर्गाने माणसाला बुद्धीचं दान दिलं आणि त्याचप्रमाणे इतर प्राण्यांना वेगेवगेळ्या गोष्टीत माणसातून अधिक सक्षम केलं. कुत्र्यांना आपल्यापेक्षा अधिक जास्त वास ओळखता येणं, घुबडांना अंधारात दिसणं, अशी अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत. असाच एक प्राणी म्हणजे साप. सापाच्या जातींमध्ये प्रचंड वैविध्य आहे. एक असाच दुर्मिळ रंगाचा साप सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात केळ्यांच्या बरोबर अजगर ठेवलेला दिसत आहे. तुम्ही सुरुवातीला व्हिडीओ पाहिलात तर तुम्हाला वाटेल की अरे ही काय दोन केळी आहेत पण जरा नीट बारकाईने पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की यात एक केळं आहे आणि दुसरा चक्क जिवंत साप आहे. या जिवंत अजगराची त्वचा केळीसारखीच आहे. हा व्हिडिओ सायन्स गर्ल या अकाऊंटवरून ट्विटरवर शेअर केला आहे.

loksatta Health Special article, relationship between, skin disorders, diabetes
Health Special: त्वचाविकार आणि मधुमेह नेमका काय संबंध?
Blood Pressure drug
रक्तदाबाची औषधे मधेच बंद केल्याने तुम्हाला अधिक नुकसान होऊ शकते? काय सांगतात डाॅक्टर… 
How to Remove Hair from Your Upper Lip Naturally
Dark Upper Lips: आता अप्पर लिप्स करण्यासाठी पार्लरची गरज नाही; या ४ घरगुती उपायांनी मिळवा सुटका
i Benefits Of Using Cast iron Utensils Does Food Turn Black in Iron Kadhai
लोखंडी कढई किंवा बिड्याचा तवा वापरून चव व आरोग्याला काय फायदे होतात? कशी घ्यावी काळजी?

केळी आहेत की अजगर?

प्राप्त माहितीनुसार या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या अजगराला बॉल पायथॉन म्हणून ओळखले जाते. बॉल अजगर त्याच्या संरक्षणाच्या भन्नाट ट्रिकसाठी ओळखला जातो ज्यामध्ये धोक्यात आल्यावर त्याचे डोके आणि मान मध्यभागी ठेवून तो स्वतःला घट्ट बॉलच्या रूपात गुंडाळू शकतो.

हे ही वाचा<< Video: कोंबडीच्या पिल्लाने हत्तीला दमवलं, चिखलात पडला.. स्वतःचं टेन्शन विसरायला लावतील ‘ही’ दोघं

दरम्यान या व्हिडिओला आतापर्यंत ७ लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर आश्चर्यचकित होऊन कमेंट्स केल्या आहेत. काहींनी तर कमेंट करत लिहिले की, विचार करा तुम्ही घरात फ्रीजमधून केळी बाहेर काढायला जाता आणि हा अजगर तुमची वाट पाहत बसलेला असतो. यावरून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. तुम्ही आजपर्यंत असा कोणता प्राणी स्वतः पहिला आहे का? कमेंट करून नक्की कळवा.