scorecardresearch

बाई काय हे टॅलेंट? महिलेने १८० डिग्रीमध्ये फिरवली मान, Video पाहून तुम्हीच डोकं धराल

Viral Video: तुम्हाला आता वाचून अतिशयोक्ती वाटत असेल पण तिची मान फिरवण्याची पद्धत व लवचिकता पाहून तुम्हाला नक्की या टॅलेंटवर विश्वास बसेल.

Video Shocking Women Turned Head in 180 Degree Viral Clip Trending Online Today Will Give You Goosebumps
बाई काय हे टॅलेंट? महिलेने १८० डिग्रीमध्ये फिरवली मान, Video पाहून तुम्हीच डोकं धराल (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Woman Turned Head 180 Degree: सोशल मीडियावर आपण अनेकदा जिम्नॅस्टिक खेळणाऱ्या खेळाडूंचे व्हिडीओ पाहिले असतील. आपल्यापैकी अनेकांना साधं स्वतःच्या पायाचे अंगठेही पकडणे शक्य होत नसताना या खेळाडूंची लवचिकता बघून साहजिकच कौतुक वाटतं. पण आता जो व्हिडीओ व्हायरल होत आहे तो पाहून केवळ कौतुकच नाही तर तुम्हीही थक्क व्हाल. यामध्ये एका महिलेने चक्क आपली मान १८० अंशात फिरवली आहे. तुम्हाला आता वाचून अतिशयोक्ती वाटत असेल पण तिची मान फिरवण्याची पद्धत व लवचिकता पाहून तुम्हाला नक्की या टॅलेंटवर विश्वास बसेल.

ट्विटरवर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये एक महिला काही लवचिकतेचे खेळ दाखवत आहे. यात एक महिला खाली बसली आहे तर दुसरीने तिचे डोके धरले आहे. खाली बसलेली महिला हळूहळू आपली मान फिरवण्यास सुरुवात करते. आधी ४५ अंश मग ९० अंश अशी मान फिरवताना तिची चपळता पाहून आधी जरा कौतुक वाटतं पण मग नंतर ती मान वळवून थेट १८० अंश मागे बघू लागते हे बघून प्रेक्षक व आता नेटकरी सुद्धा घाबरूनच गेले आहेत. पूर्ण शरीर पुढच्या बाजूला तर मान व चेहरा मागच्या बाजूला अशा स्थितीत ही महिला काही सेकंद थांबते व त्यानंतर पुन्हा मूळ स्थितीत येते.

बाई बाई काय हे टॅलेंट…

हे ही वाचा<< भरविमानात आंघोळ? महिलेचा Video पाहून भडकले नेटकरी, म्हणतात, “नुसते पैसे…”

दरम्यान हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर अनेकांनी ही कुठली शक्ती आहे असा प्रश्न केला आहे. या व्हिडिओवर आतापर्यंत लाखो व्ह्यूज व कमेंट्स पाहायला मिळत आहेत. हा व्हिडीओ पाहून कितीही कौतूक वाटत असले तरी चुकूनही असा प्रकार घरी करून पाहायला जाऊ नका.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-03-2023 at 11:21 IST