Video Shocking Women Walks With Three Lions In a Viral Clip Does Something Unexpected | Loksatta

Video: तीन सिंह एकत्र समोर आले तर..’या’ तरुणीचा कॉन्फिडन्स पाहून उडेल थरकाप, अवघ्या १० सेकंदात..

Trending Video: विचार करा अचानक तुमच्यासमोर तीन भलेमोठे सिंह येऊन उभे ठाकले तर.. विचारानेही घाम फुटतो ना? पण काहींना निसर्गतःच

Video: तीन सिंह एकत्र समोर आले तर..’या’ तरुणीचा कॉन्फिडन्स पाहून उडेल थरकाप, अवघ्या १० सेकंदात..
Video: तीन सिंह एकत्र समोर आले तर.. 'या' तरुणीचा कॉन्फिडन्स पाहूनही उडेल थरकाप (फोटो: इंस्टाग्राम)

Viral Video Today: आयुष्य रुबाबात घालवावं अशी प्रत्येकाची इच्छा असते पण अनेकदा परिस्थितीसमोर माणूस झुकतोच. आता ही परिस्थिती म्हणजे अगदी एखादी आर्थिक, सामाजिक असावी असा काही नियम नाही. काही वेळा निसर्गच आपल्यासमोर असं चित्र उभं करू शकतो की त्यापुढे गुडघे टेकण्याला पर्यायच उरत नाही. विचार करा अचानक तुमच्यासमोर तीन भलेमोठे सिंह येऊन उभे ठाकले तर.. विचारानेही घाम फुटतो ना? पण काहींना निसर्गतःच कोणत्याही परिस्थितीत Chill राहण्याचे वरदान लाभलेले असते. अशाच एका महिलेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ही महिला चक्क तीन सिंहांसह रुबाबात एखाद्या राणीप्रमाणे चालताना दिसत आहे.

इंस्टाग्रामवर जेन नावाच्या एका महिलेने हा व्हिडीओ शेअर केला आहे. बरं हा सिंहासह फिरण्याचा एकमेव व्हिडीओ नाही तर तिच्या अकाउंटवर सिंहासह खेळतानाचे, त्यांना खाऊ घालतानाचे सुद्धा अनेक व्हिडीओ पाहायला मिळत आहेत. जेनने सिंहासह फक्त चालताना शेअर केलेल्या व्हिडिओला आतापर्यंत ६० लाख व्ह्यूज मिळाले आहेत.

हे ही वाचा<< Video: जंगलाचा राजा झाला भावुक; ७ वर्षांनी मालकीण दिसताच भल्यामोठ्या दोन सिंहांनी उडी घेतली अन..

तीन सिंह एकत्र समोर आले तर..

अर्थातच हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांची मात्र भांबेरी उडाली आहे. अनेकांनी या शूर महिलेचे कौतुक करून तिच्या हिमतीला दाद दिली आहे. काहींनी तर मजेशीर कमेंट करून मला तर समोर एकावेळी दोन कुत्रे आले तरी भीती वाटते आणि ही तर चक्क सिंहासह चालतेय असं म्हंटल आहे.

हे ही वाचा<< Video: माझा नवरा मला… घरगुती कार्यक्रमात बेभान झाली सुनबाई; असं काही केलं की नवऱ्याने तोंडच लपवलं

एका इंस्टाग्राम युजरने कमेंट करून सांगितले की काहीवेळा पूर्ण प्रशिक्षण देऊनही काही प्राणी कसे चिडतील याचा अंदाज घेता येत नाही. काही दिवसांपूर्वी अशाच एका शिकवलेल्या वाघासह जादू करताना जादूगाराने नुसता हात लावला म्हणून वाघ चिडला होता. हे जंगली प्राणी चिडले तर एक सेकंदात आपला फडशा पाडू शकतात. पण या महिलेने जे धैर्य दाखवलं आहे त्याला खरंच दाद द्यायला हवी असे अनेकांनी म्हंटले आहे. तर काहींनी मात्र हा मूर्खपणा आहे, हे असं करायची काही गरजच नव्हती असं म्हणत महिलेलाच दोष दिला आहे. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला नक्की कळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 17:40 IST
Next Story
ऐकावं ते नवलच! पोलिसांनी मारला पोलिसांच्या गाडीवर डल्ला; डिझेलचा मोह अंगलट आला…