Viral Video Of Ganpati Bappa : ७ सप्टेंबर २०२४ रोजी आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन झाले. त्यानंतर दीड दिवस, पाच दिवस, गौरी-गणपतीचे विसर्जनसुद्धा झाले. त्यानंतर आता १७ तारखेला अनंत चतुर्दशी असून, त्या दिवशी १० दिवसांच्या गणपतींचे विसर्जन होणार आहे. गणेशोत्सवादरम्यान नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. तर, आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये विसर्जनादरम्यान एक काका गणपती बाप्पाच्या कानात काहीतरी इच्छा सांगताना दिसत आहेत.

बाप्पाच्या मंदिरात गेल्यावर आपण सहसा उंदीरमामाच्या कानात आणि देवासमोर हात जोडून मनातली इच्छा नक्कीच सांगतो. बुद्धी दे, परीक्षेत चांगल्या मार्कांनी पास कर, माझ्या कुटुंबाला आनंदी ठेव, प्रत्येक सुख-दु:खात माझ्याबरोबर नेहमी राहा आदी अनेक इच्छा आपण गणपतीच्या कानात सांगतो. आज व्हायरल व्हिडीओत काकांनी सुद्धा असंच केलं आहे. त्यांची इच्छा अनोखी तर आहेच; पण मजेशीरसुद्धा आहे. गणपती बाप्पाचे विसर्जन करण्याची तयारी सुरू असते. काका बाप्पाजवळ येतात आणि त्यांची इच्छा सांगण्यास सुरुवात करतात. नेमकं त्यांनी कानात काय सांगितलं ते व्हायरल व्हिडीओतून (Video) तुम्हीसुद्धा बघा…

हेही वाचा…खरं प्रेम! मालकाबरोबर जाण्यासाठी धडपड! श्वानाने रुग्णवाहिकेचा केला पाठलाग अन्… ; पाहा VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

बाप्पाच्या कानात काका कुजबुजत काय म्हणाले ?

व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिलं असेल की, काका बाप्पाच्या कानात हिंदीमध्ये म्हणतात, “गणपती बाप्पा मुझे समोसा के साथ मिठी चटनी, तिखी चटनी और हरी मिर्च भी देना ठीक हैI” म्हणजेच “गणपती बाप्पा मला समोशाबरोबर गोड चटणी, तिखट चटणी आणि हिरवी मिरचीसुद्धा द्या ठीक आहे”, असे म्हणाताना दिसले आहेत. ते पाहून त्यांची लेकदेखील हसताना दिसत आहे. यादरम्यान तिने हा क्षण तिच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतला आणि शेअर केला आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ (Video) @swatii.amare या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘ओके’ व एक इमोजी देऊन, छोटीशी कॅप्शनही लिहिलेली आहे. तर, नेटकरीसुद्धा हा व्हिडीओ पाहून मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. एक युजर म्हणतोय, “अरे, ते गणपती बाप्पा आहेत; समोसेवाले नाहीत.” दुसरा युजर म्हणतोय, “सुखी चटणी मागितली नाही” आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. एकूणच सोशल मीडियावर या मजेशीर व्हिडीओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.