Viral Video Girl Shravani’s New Video : आजकाल सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. चिमुकल्यांचा डान्स, त्यांची ॲक्टिंग, त्यांनी नकळत केलेली मस्ती असे अनेक व्हिडीओ त्यांचे पालक सोशल मीडियावर शेअर करतात आणि त्यांचा निरागसपणा प्रत्येकाचे मन जिंकून जातात. तर तुम्ही ‘आज तो संडे है’ या मीमने सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या चिमुकली श्रावणी शर्माचे व्हिडीओदेखील नक्कीच पाहिले असतील. तर आज हीच चिमुकली इन्स्टाग्रामवर एक नवीन व्हिडीओ घेऊन आली आहे.
व्हिडीओची (Viral Video)सुरुवात श्रावणी अगदी रागिष्ट हावभाव देऊन करते. त्याचबरोबर मोबाइल हातात घेऊन, फ्रंट कॅमेरा चालू करून अशा मित्रांबद्दल सांगताना दिसते, जे वेळोवेळी आपल्या बरोबर असतात, प्रत्येक संकटात आपल्या मदतीला धावून येतात. तर श्रावणी म्हणते की, ‘जो मित्र तुमच्या प्रत्येक संकटात तुमच्या बरोबर असतो, त्याची साथ सोडून द्या’… तर श्रावणी नेमके असे का म्हणाली असेल असा प्रश्न तुम्हालाही नक्कीच पडला असेल ना… तर याचे उत्तर व्हायरल व्हिडीओतून एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत (Viral Video) तुम्ही पाहिले असेल की, श्रावणी म्हणते, ‘जो मित्र तुमच्या प्रत्येक संकटात तुमच्या बरोबर असतो, त्याची साथ सोडून द्या. असे बोलून ती थोडा वेळ थांबते आणि युजर्सना विचार करायला भाग पाडते आणि म्हणते, ‘कोणास ठाऊक कदाचित तोच मित्र तुमच्या समस्यांचे कारण असेल’ (जो दोस्त आपके हर मुसिबत में आपके साथ होता है उसे छोड़ दो, क्या पता वही मुसिबत का कारण हो) असे ती वाक्य पूर्ण करत, हसत-हसत म्हणताना दिसते. तसेच चिमुकली कारण नाही तर कालन म्हणते, हे ऐकूनसुद्धा तुम्हालाही नक्कीच हसू येईल.
मस्ती मस्तीमध्ये खरं तर नाही बोलून गेलीस ना ?
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @shravanix29 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘संकटाचे कारण’; अशी कॅप्शन त्यांनी व्हिडीओला दिली आहे. व्हिडीओवर अनेक नेटकरी लाफ्टर इमोजी कमेंटमध्ये पोस्ट करताना दिसत आहेत, तर काही जण ‘मस्ती मस्तीमध्ये खरं तर नाही बोलून गेलीस ना तू’ (मजाक मजाक में कहीं सही तो नहीं बोल दिए), ‘खरी गोष्ट आहे’ (सही बात हैं); आदी अनेक कमेंट करत चिमुकलीच्या बोलण्याला सहमती दर्शविताना दिसत आहेत.