Video Shows elderly woman drives an auto at night to earn a living : आपल्यातील अनेक जण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, चांगली नोकरी मिळेल आणि घरची परिस्थिती बदलेल अशा दिशेने भविष्याची वाटचाल करतात. मात्र काही जण शिक्षणानंतर नोकरी करत नाहीत आणि घरात कोणी कमावणारे नसल्यामुळे मग अशावेळी कुटुंबातील इतर सदस्यांना उदरनिर्वाहासाठी घराबाहेर पडावे लागते. तर अशीच एक गोष्ट आज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आपला मुलगा नोकरी करत नसल्यामुळे उदरनिर्वाहासाठी एक महिला रात्री रिक्षा चालवण्याचे काम करते आहे.

कन्टेंट क्रिएटर आयुष गोस्वामी रिक्षातून प्रवास करत होता. रात्री १२ वाजता एक महिला रिक्षा चालवते आहे हे पाहून त्याला थोडं आश्चर्यच वाटले. म्हणून तो महिलेला प्रश्न विचारण्यास सुरुवात करतो.त्यांच्या संवादातून असे लक्षात येत आहे की. ५५ वर्षीय महिलेला एक मुलगा आहे. पण, तो मुलगा नोकरी करत नसल्यामुळे तिला घराबाहेर पडावे लागते आहे. मुलगा आईकडे पैसे मागतो आणि पैसे दिले नाही की भांडण सुद्धा करतो. त्यामुळे मुलाच्या स्वभावाला कंटाळून त्या घराबाहेर पडतात आणि उदरनिर्वाहासाठी संध्याकाळी रिक्षा चालवतात. व्हायरल व्हिडीओतून ( Video) तुम्हीसुद्धा ऐका ही गोष्ट…

Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Man wrote message for his wife in back of the car video goes viral
किती ते प्रेम! नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून कराल कौतुक
Puneri pati viral for parking in his spot funny puneri pati goes viral
PHOTO: पुणेकरांचा नाद नाय! गेट समोर गाडी पार्क करणाऱ्यांना आकर्षक बक्षिसे; शेवटचं बक्षिस वाचून पोट धरुन हसाल
Mumbai Goa Traffic Jam
VIDEO: “एका रात्रीत अर्धी मुंबई रिकामी करायची ताकद” वाहनांची प्रचंड गर्दी; मुंबई-गोवा हायवेवर लोक रस्त्यावर उतरले
anganwadi worker cross the flooded river video goes viral
Video : पूर आलेली नदी ओलांडण्यासाठी अंगणवाडी सेविकेने काय केले?
Vasai, bhayandar railway station suicide, father and son suicide, Jai Mehta, dual marriage, Bhayandar railway station, southern girl
वसई : पिता पुत्राचे रेल्वे रूळावरील आत्महत्येचे गूढ उकलले; मुलाचे प्रेमसंबंध उघड
prank with sandwich seller | Funny Viral Video
“हे सँडविच कोणी बनवले?” तरुणाने जोराने ओरडत विचारले, विक्रेता घाबरत पुढे आला अन्… पाहा व्हायरल VIDEO

हेही वाचा…Mumbai Local : इन्स्टाग्रामचा लोगो असणारी चप्पल कधी पाहिली आहे का? प्रवासी PHOTO शेअर करत म्हणाला, ‘डिअर…’

व्हिडीओ नक्की बघा…

भीक मागण्यापेक्षा काम करणं जास्त चांगलं :

व्हायरल व्हिडीओत ( Video) तुम्ही पाहिलं असेल की, प्रवासी आयुष गोस्वामी यांनी काही प्रश्न विचारल्यावर महिला तिची दिनचर्या सांगण्यात सुरुवात करते. घरातील सगळी काम आवरून ती संध्याकाळी घराबाहेर पडते आणि रात्री १:३० ला घरी जाते. तिचा मुलगा २ वर्षाचा असताना तिच्या नवऱ्याचे निधन झाले. पण, मुलगा नोकरी करत नसल्यामुळे, तिच्याशी नीट वागत नसल्यामुळे तिने कंटाळवून उदरनिर्वाहासाठी हा मार्ग निवडावा लागला. तसेच ‘भीक मागण्यापेक्षा काम करणं जास्त चांगलं आहे’ असे महिलेचे म्हणणे आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ ( Video) कन्टेंट क्रिएटर आयुष गोस्वामी यांच्या @aapkartekyaho या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून अनेक युजर्सनी महिलेच्या मुलाची निंदा केली आणि सांगितले की जीवनातील आव्हानांना तोंड कसं द्यायचे याची प्रेरणा या आईकडून घ्यावी. तसेच काही युजर्स देव तुमचे भलं करो ; आदी कमेंट देखील करताना दिसून आले.एकूणच आईची ही गोष्ट ऐकून तुमचेही डोळे पाणावतील.