Viral Video Of Birthday Special Marathi Song : आपला वाढदिवस अगदी खास पद्धतीने साजरा व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यातच मित्र-मैत्रिणींबरोबर आपला वाढदिवस साजरा करणे म्हणजे सुख असते. कारण या वाढदिवसादिवशी ते असं काहीतरी खास करतात की ती गोष्ट आपल्या आयुष्यभर लक्षात राहते. आजवर केक कापताना ‘हॅपी बर्थडे’, ‘बार बार दिन ये आए’, हे गाणं आपण हमखास म्हणतो. पण, आज एका बँजो पथकाने त्यांच्या भाऊजींचा वाढदिवस तर साजरा केला. पण, हिंदी, इंग्रजी नाही तर मराठीमध्ये वाढदिवसाचे गाणं म्हंटल आहे.
व्हायरल व्हिडीओ (Video) मुंबईच्या कांदिवलीचा आहे. बहुतेक हा गणेशोत्सवादरम्यानचा व्हिडीओ आहे. बाप्पा विराजमान झाले आहेत आणि बाप्पाच्या पुढ्यात एक बँजो पथक त्यांच्या कौशल्याचे उत्तम सादरीकरण करताना दिसत आहेत. तसेच बँजो पथकातील व्यक्तीच्या भाऊजींचा वाढदिवस असतो. तर हा वाढदिवस खास कसा करता येईल यासाठी सगळे मिळून एक योजना आखातात. तर भाऊजींच्या वाढदिवसासाठी केक आणला जातो आणि मग पियानो, बँजोच्या तालावर ‘हॅपी बर्थडे’ चं मराठी व्हर्जन गायलं जात. तुम्हीसुद्धा नक्की ऐका ‘हॅपी बर्थडे’ च मराठी व्हर्जन…
हेही वाचा…बाईईई…! आज्जीची मशेरी लावण्याची सवय, नातवाने निक्कीच्या स्टाईलमध्ये गायलं गाणं; पाहा VIDEO
व्हिडीओ नक्की बघा…
वाढदिवस आमच्या भाऊजींचा…
व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही ऐकलं असेल की, आता मराठीत… असं म्हणून बँजो पथकातील काही जण माईकवर गाणं म्हणण्यास सुरुवात करतात. “पुन्हा पुन्हा वाढदिवस यावा. वाढदिवस आमच्या भाऊजींचा, पुन्हा पुन्हा हा दिवस यावा, वाढदिवस आमच्या भाऊजींचा, तुम्ही हसत खेळत रहा हीच आमच्या सर्वांची इच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ओहोहो…” असं गाणं गायलं जात आणि भाऊजींना केक भरवला जातो. उपस्थित सगळे या गाण्याला त्यांच्या सुरांची साथ देखील देतात.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ (Video) @saimaulibhajanmandalkandivali या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘आम्ही अशाप्रकारे वाढदिवस साजरा करतो’ ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. पियानो, बँजोच्या तालावर गायलेलं हे गाणं अनेकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी सुद्धा या गाण्याचे कौतुक कमेंटमध्ये करताना दिसत आहेत. तर तुम्हाला ‘हॅपी बर्थडे’ च मराठी व्हर्जन आवडलं का आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.