Video Shows Little Girl First First Train Journey : तुम्ही सगळ्यात पहिला मुंबई लोकलमधून कधी प्रवास केला हे आठवणे थोडे कठीणच आहे नाही का? पण सध्या मोबाईल, कॅमेरा या सगळ्याच गोष्टींमुळे आयुष्यात केलेल्या सगळ्या पहिल्या गोष्टी कॅप्चर करता येतात. काही जण मिनी ब्लॉगद्वारे, तर अनेक जण इन्स्टाग्राम रील्सद्वारे हे क्षण सोशल मीडियावर शेअर करत असतात. आज असाच एक व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. त्यामध्ये एका आईने तिच्या चिमुकलीचा पहिला ट्रेन प्रवास रीलद्वारे दाखविला आहे.

व्हायरल व्हिडीओ (Video) मुंबई लोकलमधील आहे. चिमुकलीचे नाव शिवाज्ञा असते. शिवाज्ञा तिच्या आईबरोबर ट्रेनमधून पहिल्यांदा प्रवास करायला जाते. दरम्यान, ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी असते. तेव्हा या चिमुकलीला बहुतेक तिच्या बाबा किंवा आजोबांनी उचलून घेतल्याचे दिसते आहे. जशी मोठी माणसे ट्रेनमध्ये गर्दी असल्यावर हॅण्डल पकडून उभे असतात अगदी त्याचप्रमाणे चिमुकलीही स्टीलच्या हॅण्डलला धरून आहे. चिमुकलीचा पहिला ट्रेन प्रवास व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा नक्की बघा…

pune metro
पुणेकरांचा नादखुळा! पुणे मेट्रोतून प्रवास करताना तरुणांनी केले असे काही, Viral Video पाहून पोटधरून हसाल
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Mumbai young boys present amazing lavani dance
Video : मुंबईच्या तरुणांनी मरीन ड्राइव्ह येथे सादर केली भन्नाट लावणी, व्हिडीओ पाहून गौतमी पाटीलला विसराल!
Ankush Chaudhari as Police officer
अंकुश चौधरी पहिल्यांदाच दिसणार पोलिसाच्या भूमिकेत; ‘पी. एस. आय. अर्जुन’ चित्रपटातील लूक पोस्टर रिलीज
a place in maharashtra showcasing on a 20 rupees
Video : २० रुपयांच्या नोटेवर आहे महाराष्ट्रातील या लोकप्रिय ठिकाणाचे चित्र; तरुणाचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
Stampede at kumbh mela
Stampede in Kumbh Mela : १९५४ ते २०२५ कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या घटनांनी पर्वणीला गालबोट, काय आहे क्लेशदायक इतिहास?
flying first class for the very first time
पहिली वेळ नेहमीच खास असते! चिमुकलीचा पहिला विमान प्रवास आईने केला स्पेशल; VIDEO तील प्रत्येक सोय पाहून उंचावतील भुवया
Deepika Padukone Ramp Walk
Video : लेकीच्या जन्मानंतर पहिला रॅम्प वॉक! दीपिका पादुकोणचा ‘तो’ लूक पाहून नेटकऱ्यांना आठवली रेखा, कमेंट्सचा पाऊस

व्हिडीओ नकी बघा…

व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिले असेल की, चिमुकली पहिल्यांदा ट्रेनमधून प्रवास करते आहे, असे तिच्या आईने आवर्जून कॅप्शनमध्ये लिहिल्याचे दिसते आहे. ट्रेनमध्ये आजूबाजूला भरपूर माणसे पाहून, ती सगळ्यांकडे आश्चर्याने बघते आहे. त्याचबरोबर ते हॅण्डल पकडून अगदी मोठ्या माणसांप्रमाणे उभी आहे हे पाहून आई हा क्षण तिच्या मोबाईलमध्ये कॅप्चर करते आणि ‘अरे बापरे… ट्रेनमध्ये जागा न भेटल्याने पूर्ण प्रवास उभा राहून करावा लागला’, असा मजकूर लिहून व्हिडीओ शेअर करते.

बाई बाई बाई…!

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ (Video) @bhagyashreecookvlog आणि @shivadnya_shreeyansh_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी व्हिडीओतील चिमुकलीचे हावभाव पाहून, “ती विचार करतेय, बाई बाई बाई…! केवढी ही गर्दी मुंबईमध्ये …!”, “ती म्हणत असेल कसले खडूस लोक आहेत छोट्या लेकराचीसुद्धा दया येत नाही यांना”, “हावभाव पाहून असे वाटतेय की, ती मनात म्हणतेय हे काय नवीन आता’ ” आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

Story img Loader