Man celebrates bike’s birthday : वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास दिवस असतो. हा दिवस सजावट, केक, आवडीचे पदार्थ या गोष्टींमुळे आणखीन खास ठरतो. आजकाल तर अगदी माणसांपासून ते प्राण्यांपर्यंत सगळ्यांचे वाढदिवस साजरे केले जात आहेत. तर आज असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये आज एका पठ्ठयाने त्याच्या बाईकचा वाढदिवस साजरा केला आहे. पण, हा केक त्याने स्वतः कापला नाही. मग हा केक कसा कापण्यात आला हे आपण लेखातून सविस्तर जाणून घेऊ…
व्हायरल व्हिडीओ ( Video) नेमका कुठला आहे याची अद्याप माहिती कळू शकलेली नाही. मात्र बाईकचा वाढदिवस साजरा करण्यासाठी काही जण एकत्र जमले आहेत. एकाने बाईकला धरून ठेवले आहे. तर दुसरी व्यक्ती हातात केक घेऊन उभी आहे. थोड्याच वेळात केक कापण्यास सुरुवात होते. पण, बाईकचा केक यावेळी त्याचा मालक कापात नाही तर बाईकच्या समोरच्या टायरला सूरी लावून ठेवते. बाईक पकडून उभी असलेली व्यक्ती थोडस बाईकला पुढे ढकलते. तर नंतर कशाप्रकारे केक कापण्यात आला व्हायरल व्हिडिओतून तुम्हीसुद्धा बघा…
हेही वाचा…VIDEO: तिची-माझी मैत्री! डान्स करताना स्टेप्स विसरली अन्… पाहा चिमुकलीने मैत्रिणीची कशी केली मदत
व्हिडीओ नक्की बघा..
मालकाकडून बाईकचे लाड :
तरुण मंडळींसाठी त्यांची बाईक खूप महत्वाची असते. अगदी बाईकला कव्हर लावण्यापासू ते बाईकच्या चावीला किचेन लावण्यापर्यंत ते बाईकला खूपच जपताना दिसतात. तर व्हायरल व्हिडिओ ( Video) तुम्ही पाहिलं असेल कि, एका बाईकप्रेमीने त्याच्या बाईकचा वाढदिवस साजरा केला आहे. बाईकसमोर केक घेऊन उभा राहिला, बाईकच्या टायरमध्ये सूरी लावून, बाईकचे हँडल पुढे करून बाईकद्वारे हा केक कापण्यात आला आहे. जे पाहून आजूबाजूची मंडळी देखील हसताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ ( Video) @Shahrcasm या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘ कोण म्हणतं पुरुषांना भावना नसतात’ अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकऱ्यांनी व्हिडीओ पाहून माणसाच्या बाईकवर असणाऱ्या प्रेमाची प्रशंसा केली. तसेच एका युजरने कमेंट केली की, “सायलेन्सर वापरून मेणबत्त्या देखील फुकू शकत होतास भावा” , “कोणताही मालक त्यांच्या बाईकचा वाढदिवस विसरूच शकत नाही” ; आदी अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.