Chawl Viral Video : बिल्डिंगमध्ये स्थलांतरित झाल्यानंतर चाळीत राहण्याची खरी किंमत कळते. पाण्यासाठी भांडण, छोट्याश्या गल्लीत क्रिकेट, एकाच्या घरी लग्न तर सगळ्यांच्या घरी धावपळ, दिवाळीमध्ये कंदील, दिव्यांचा लक्ख प्रकाश असा चाळीतला प्रत्येक दिवस असायचा. त्यामुळे आपण सोयी-सुविधा असणाऱ्या बिल्डिंगमध्ये जरी गेलो. तरी चाळीतल्या घराची, माणसांची आठवण आल्याशिवाय एकही दिवस जात नाही. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतो आहे.

व्हायरल व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, आपल्या तुटलेल्या चाळीकडे बघत काही तरुण मंडळी आणि आजी त्यांच्या आठवणींना उजाळा देताना दिसत आहेत. खूप वर्षांपूर्वी आजीचा प्रवास या चाळीतूनच सुरु झाला होता. हा संसार हळूहळू तीन पिढ्यांपर्यंत पोहचला आणि व्हिडीओत उपस्थित सगळ्यांनी चाळीचा निरोप घेतला. पण, घराबाहेर असणारं, पिढ्यांना आपल्या सावलीत खेळवणारं झाड मात्र आपली मूळ घट्ट रोवून तिथेच उभं होतं. त्या झाडाला आपल्या बिल्डिंगमधून बघत प्रत्येक जण चाळीतलं त्यांच्या सुख-दुःखाचे क्षण शोधत होतं.

जिथे आपला जन्म झाला तेचं आपलं असतं (Viral Video)

तर या व्हिडीओबद्दल सांगत युजरने , “एवढ्या मोठया जगात तो एक कोपरा माझा जिथे कधीतरी पुन्हा परतावं वाटतं. ते झाड तो ओटा.. हो खूप वर्षांपूर्वी तिथेच आजीचा संसार सुरू झाला होता आणि तिथेच सुख-दुःखाचा प्रवास करत वेळ माझ्या तरुणपणापर्यंत पोहचली. झाडामुळे आपलं घर नक्की कुठे होतं याचा अंदाजा घेत घेत मन परत त्या घराच्या उंबऱ्यापाशी जाऊन उभं राहतं. आता त्या जगाचं अस्तित्व संपलं, पण ३ पिढ्यांना आपल्या सावलीत खेळवलेलं झाड अजूनही आपली मूळ घट्ट रोवून उभा आहे. कदाचित या वेड्या आशेत की त्याच्या सावलीत बहरलेली पाखरं पुन्हा कधीतरी त्याच्या विसाव्याला येतील” : अशी कॅप्शन लिहिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @.atharava. या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “तुम्हाला तुमच्या चाळीची आठवण येते का” ; असा मजकूर व्हिडीओवर दिला आहे. नेटकरी सुद्धा व्हिडीओ पाहून भावूक झाले आहेत आणि “खूपच आठवणी असतात आपण ज्या घरात आपण लहानाचे मोठे झालो. अशा ठिकाणी आपली नाळ जुळलेली असते. आम्हालाही खूप वाईट आमचे राहते घर सोडताना… आपण किती मोठ्या घरात गेलो, किंवा नवीन घरात तरी जिथे आपला जन्म झाला आहे तेच आपलं असतं त्याची तुलना कुठेच होऊ शकत नाही”, “गेले ते दिवसा मागे ठेऊनी आठवणी” ; आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत…