Leopard Viral Video: भूत असतं का हो खरंच? या एका प्रश्नावर आजवर अनेक पुस्तके लिहिली गेली. श्रद्धा- अंधश्रद्धा यावर वादविवाद झाले. पण अजूनही एक ठोस उत्तर मिळालेले नाही. भुताची ओळख अशी काय? तर माणसाला न दिसणे, वेगाने उलट सुलट धावणे. आता हेच गुण असलेला एक प्राणी सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंड होतोय. या प्राण्याचे नाव म्हणजे हिम बिबट्या. अर्थात बर्फात आढळणारा अत्यंत दुर्मिळ प्रजातीचा बिबट्या. अत्यंत वेगवान, अत्यंत चालाख व चपळ असा बर्फाच्छादित प्रदेशातील बिबट्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. यात बिबट्याने शिकार करताना समोरच्या प्राण्यालाच नव्हे तर गुरुत्वाकर्षणाला सुद्धा मात दिल्याचे पाहायला मिळतेय.

आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी त्यांच्या ट्विटर प्रोफाइलवर असाच एक व्हिडिओ शेअर केला आहे. क्लिपमध्ये, एक बर्फाळ भागातील बिबट्या एका प्राण्याच्या मागे एक अत्यंत उंच उतारावर धावताना दिसत आहे. व्हिडिओ जसजसा पुढे जातो तसतसे, बिबट्या एका कड्यावरून अडखळून पडणार अशी स्थिती येते पण तरीही तो सहज शिकार पकडतो. १३ मार्चला सदर व्हिडीओ लडाख उरियालजवळ उल्ले आणि श्यापू येथे शूट करण्यात आला होता.

istanbul fire
इस्तंबूलच्या नाईटक्लबमध्ये भीषण आग, २९ जणांचा होरपळून मृत्यू!
tiger unexpectedly came out of bushes jumped on cow
जंगल सफारीचा आनंद घेत होते पर्यटक, अचानक झुडपातून बाहेर आला वाघ, उडी मारून….पुढे काय घडले ते व्हिडीओमध्ये बघा
tiger jumps 20 feet to cross river vide
वाघ की रॉकेट? वाघाच्या उडीची सोशल मीडियावर एकच चर्चा…सुंदरबनमधील VIDEO व्हायरल
True and pure love
आयुष्यात फक्त असं प्रेम मिळाले पाहिजे! आजोबांना घास भरवणाऱ्या आजींचा व्हिडीओ बघाच

Video: बर्फात बिबट्याने केलेली शिकार…

हे ही वाचा<< फडणवीसांच्या घोषणेवरून आजींचा बसमध्ये राडा; जीव घेण्याची धमकी देत कंडक्टरला मारहाण, Video पाहिलात का?

दरम्यान या शिकारीच्या व्हिडिओला १ लाखाहून जास्त व्ह्यूज आणि अनेक कमेंट्स मिळाल्या आहेत. दुर्मिळ दृश्याने नेटिझन्स पूर्णपणे थक्क झाले आहेत . भल्यामोठ्या बिबट्याने कड्यावरून पळताना आपले भक्ष्य किती वेगाने पकडले हे पाहून लोक हादरून गेले आहेत.