scorecardresearch

Video: हात धरला, तोंड खेचलं आणि बघ्यांनी मला.. दक्षिण कोरियातील तरुणीने सांगितला मुंबईतील धक्कादायक अनुभव

South Korean Women Molested In Mumbai: महिलेची छेड काढणाऱ्या मोबीन चंद मोहम्मद शेख आणि मोहम्मद नकीब सदरेलम अन्सारी या दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे.

Video: हात धरला, तोंड खेचलं आणि बघ्यांनी मला.. दक्षिण कोरियातील तरुणीने सांगितला मुंबईतील धक्कादायक अनुभव
Video: हात धरला, तोंड खेचलं आणि बघ्यांनी मला.. (फोटो: ट्विटर)

South Korean Women Molested In Mumbai: दक्षिण कोरियाच्या एक महिला युट्यूबरसह मुंबईतील रस्त्यांवर एक अत्यंत लज्जास्पद प्रकार घडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. युट्यूबर लाइव्ह स्ट्रीमिंग करत असतानाच दोन तरुणांनी तिची छेड काढली. इतकेच नव्हे तर यातील एकाने त्या तरुणीचा चेहरा हाताने पकडून तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत असल्याप्रमाणे छेड काढणारे दोन आरोपी संबंधित तरुणीचा हात धरून तिला आपल्या गाडीवरून नेण्याचा प्रयत्न करत होते. या प्रकरणाची दखल मुंबई पोलिसांनी घेतली असून या दोन आरोपींना अटक केली आहे.

आता या एकूण घटनेवर संबंधित तरुणीने स्वतः ट्वीट करून माहिती दिली आहे. काल रात्री (या व्हिडीओत दिसणाऱ्या) एका माणसाने मला त्रास दिला. तो त्याच्या मित्रासोबत असल्यामुळे परिस्थिती आणखी खराब होऊ नये म्हणून मी सर्वतोपरी प्रयत्न केले. तरी लाईव्ह स्ट्रीमिंगमधील काही लोक मलाच दोष देत आहेत, मी या छेड काढणाऱ्यांसह जास्त फ्रेंडली होत होते. उगाच त्यांच्याशी बोलत बसले, असेही मला अनेकजण म्हणत आहेत. या कमेंट्स, मला स्ट्रीमिंगबद्दल पुन्हा विचार करायला भाग पाडत आहेत.

(फोटो: ट्विटर)

याप्रकरणी मुंबई पोलिसांनी कुठलीच अधिकृत तक्रार आली नसल्याचे सांगितले आहे. ट्विटर वर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओची दखल मुंबई पोलिसांनी घेतली आहे. या प्रकरणी मोबीन चंद मोहम्मद शेख आणि मोहम्मद नकीब सदरेलम अन्सारी या दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, मुंबई पोलिसांनी संबंधित आरोपींना अटक केल्यावर तरुणीने ANI ला प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली की, “हाच छेडछाडीचा प्रकार माझ्यासोबत दुस-या देशातही घडला आहे. तेव्हा त्या देशातील पोलिसांनी काहीच मदत केली नव्हती. भारतात मात्र अत्यंत वेगाने सर्व कारवाई करण्यात आली. मी मागील ३ आठवड्यांपासून मुंबईत आहे व अजून काही दिवस इथे राहण्याचा विचार आहे.” ह्योजॉन्ग पार्क असे या दक्षिण कोरियाच्या युटयूबर तरुणीचे नाव आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दक्षिण कोरियातील एक महिला यूट्यूबर मोबाईलवर लाइव्ह स्ट्रीमिंग करताना दिसत आहे. महिलेला हे दोन तरुण तिच्याशी गैरवर्तणूक करत असल्याचे लक्षात येताच तिने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती महिला तिचं लाइव्ह स्ट्रीमिंग करत पुढे निघून गेल्यानंतरही छेडछाड करणारे दोन्ही तरुण तिचा पाठलाग करत होते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 14:51 IST

संबंधित बातम्या