Latur school Viral Video: ‘छडी लागे छम छम, विद्या येई घम घम’ हे दिवस जाऊन आता शाळांमध्ये हसत-खेळत शिक्षण प्रणाली आहे. शिक्षक हे मुलांचे भविष्य घडविण्याचे काम करतात. कधी ते चांगल्या कामगिरीसाठी विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप देतात; परंतु कधी चुकीची वर्तणूक केल्याबद्दल शिक्षाही देतात. तुम्हालाही तुमच्या शिक्षिकेकडून कधी ना कधी एखाद्या चुकीबद्दल शिक्षा मिळाली असेल. परंतु, काही शिक्षक विद्यार्थ्यांच्या छोट्या छोट्या चुकीचीही इतकी भयानक शिक्षा देतात की, आपण कधी त्याबाबत विचारही करू शकत नाही. असाच एक धक्कादायक प्रकार सध्या लातूरमधून समोर आला आहे.
एका शिक्षिकेने लातूरच्या एका गतीमंद विद्यार्थ्यांच्या शाळेतील एका विद्यर्थ्याला फळी तुटेपर्यंत बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून पालकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच या प्रकरणाची कसून चौकशी व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. यासंबंधीचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
मिळालेल्या माहितीनुसार, लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील, संत ज्ञानेश्वर निवासी गतीमंद विद्यार्थ्यांच्या विद्यालयात हा प्रकार घडला आहे. या विद्यालयातील शिक्षकाने एका गतीमंद मुलाला फळी तुटेपर्यंत बेदम मारहाण केली. मात्र त्याने का मारहाण केली हे अद्याप समोर आलेलं नसून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. शाळेतील शिक्षकांवर पालकांचा खूप विश्वास असतो, त्यामुळेच ते निर्धास्तपणे आपल्या पाल्यांना शाळेत पाठवत असतात. आपली मुलं सुरक्षित राहतील, शिक्षकांकडून त्यांना चांगल्या गोष्टी शिकायाल मिळतील असा विश्वासही पालकांना असतो. पण नाशिकमधअये एका शिक्षकाने जे केलं ते पाहून कोणाचाही शिक्षक या व्यक्तीवरूनच विश्वास उडेल, त्या विश्वासाला तडा जाईल.
पाहा व्हिडीओ
आपल्या मुलांनी शिकावं, मोठं व्हावं असं प्रत्येक आई-वडिलांना वाटत असतं. त्यासाठी मुलाला चांगल्या शाळेत प्रवेश घेतला जातो. त्यासोबतच मुलाला बाहेरची शिकवणी देखील लावली जाते. मुलाच्या शिक्षणासाठी आई-वडील जिवाचे रान करत असतात. शिक्षकांना देखील आपल्या विद्यार्थ्याने शिकावं असं वाटत असतं. त्यासाठी विद्यार्थ्याकडून छोटी-मोठी चूक झाल्यानंतर शिक्षक त्यांना शिक्षा देखील करतात. एखाद्या चुकीसाठी विद्यार्थ्याला अमानुष मारले जात नाही. परंतु, असाच एक प्रकार नुकताच समोर आला आहे.
शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना शारीरिक ईजा किंवा कठोर पद्धतीची शिक्षा देण्यास मनाई आहे. तशा पद्धतीच्या सूचना सर्व शाळांना नव्याने पोचविण्यात आल्या आहेत. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरीही यावर संताप व्यक्त करत आहेत. अनेकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे.
