असे म्हणतात की देव आणि भक्त यांचे नाते हृदयाशी असते. भक्ताला काही त्रास झाला तर देव त्याचे सर्व संकट दूर करतो. त्याचबरोबर देवाला प्रसन्न करण्यासाठी भक्त सर्वस्वाचा त्याग करतो. देवावरील श्रद्धेचे अनोखे उदाहरण उत्तर प्रदेशातील आग्रा येथे पाहायला मिळाले, जिथे भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीचा हात मोडला म्हणून पुजारी रडत हॉस्पिटलमध्ये पोहोचला.

उपचारासाठी याचना करत राहिले

रूग्णालयात पोहोचल्यानंतर पुजार्‍याने डॉक्टरांना भगवान कृष्णाच्या मूर्तीवर उपचार करण्याची विनंती करण्यास सुरुवात केली. पुजार्‍याने रडत रडत डॉक्टरांना सांगितले की, आंघोळ घालताना भगवान श्रीकृष्णाचा हात मोडला. पुजाऱ्याने डॉक्टरांना भगवान श्रीकृष्णाच्या हाताला प्लास्टर करायला सांगितले.

( हे ही वाचा: IND vs NZ: सामना सुरु असतानाच प्रेक्षकांकडून ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा!; पहा व्हिडीओ )

पुजारी काय म्हणत आहेत हे सुरुवातीला डॉक्टरांना काहीच समजले नाही आणि त्यांनी पुजाऱ्याला मूर्तीचे प्लास्टर कसे करायचे हे समजावून सांगायला सुरुवात केली. मात्र, पुजाऱ्याने डॉक्टरांची विनवणी सुरूच ठेवल्याने डॉक्टरांनी पुजाऱ्याच्या भावनांचा आदर करत भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीवर उपचार करण्याचे मान्य केले.

डॉक्टरांनी हातावर केलं प्लास्टर

त्यानंतर हॉस्पिटलमध्ये भगवान श्रीकृष्णाची नोंदणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांचे हात तपासले आणि नंतर प्लास्टर बांधले. यानंतर पुजारी खूप आनंदी झाले. पुजाऱ्याने सांगितले की, लाडू गोपाळचा हात मोडल्यानंतर त्याने प्रथम स्वतःहून प्लास्टर लावण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही. यानंतर गोपाळला मांडीवर घेऊन पुजारी जिल्हा रुग्णालयात धावला.

( हे ही वाचा: IND vs NZ: कसोटीत मालिकेत श्रेयस अय्यरचे पदार्पण, सुनील गावस्करकांडून मिळाली कॅप; खास क्षण कैमेऱ्यात कैद )

( हे ही वाचा: ‘या’ चार शहरात उघडणार लेडीज स्पेशल वाईन शॉप! )

भगवान कृष्णाच्या मूर्तीसोबत पुजाऱ्याचा रडण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून लोक पुजाऱ्याच्या भक्तीचे कौतुक करत आहेत.