अनेक महिने झाले, पण अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा तेलगू ब्लॉकबस्टर चित्रपट ‘पुष्पा- द राइज’ अजूनही इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाच्या क्रेझने सोशल मीडियावर पूर्णपणे कब्जा केला आहे, मग तो भारतात असो किंवा परदेशात. कन्टेन्ट क्रिएटर्सनी इंस्टाग्रामवर ‘पुष्पा’ च्या प्रसिद्ध गाण्यांवर डान्स रील्सची भरमार केली आहे. काही लोक अल्लू अर्जुनचे डायलॉग कॉपी करताना दिसले, तर काही लोक ‘सामी-सामी’, ‘श्रीवल्ली’ आणि ‘ऊ अंतवा’ गाण्यांवर ताल धरताना दिसले. अमेरिकेत तर ‘पुष्पा फिव्हर’ अजूनही सुरूच आहे.
अलीकडेच, १३ वर्षीय अमेरिकन व्हायोलिन वादक कॅरोलिना प्रोत्सेन्कोने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यावर ‘पुष्पा’ चित्रपटातील दोन गाणी सादर केली. या मुलीने तिच्या व्हायोलिनवर ‘ओ अंतवा ऊओ अंतवा’ हे गाणे वाजवले. त्याचा सूर ऐकून रस्त्याने चालणारे लोक अचानक थांबले आणि ते लक्षपूर्वक ऐकू लागले. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुलीने ज्या पद्धतीने व्हायोलिनवर गाणे सादर केले, ते पाहून उपस्थित लोक चकित झाले. कॅरोलिनाचा परफॉर्मन्स पाहून लोकांनी खूप टाळ्या वाजवल्या.
२५ वर्षाच्या मुलीने ६० वर्षाच्या वृद्धासोबत केलं लग्न; लग्नानंतर तरूणीचे दिलेली रिअॅक्शन व्हायरल
कॅरोलिनाच्या युट्युब व्हिडीओना सहसा लाखो व्ह्यूज मिळतात, कारण तिचे ७ दशलक्षाहून अधिक सब्सक्राइबर्स असून ती एक प्रसिद्ध युट्युबर आहे. तिच्या व्हायरल व्हिडीओमुळे तिने ‘द एलेन शो’मध्येही परफॉर्म केले. व्हायोलिनवरील ‘ओ अंतवा’ कव्हर काही दिवसांपूर्वी युट्युबवर अपलोड करण्यात आले होते आणि याला ७४१ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडिया वापरकर्त्यांनी इतर प्लॅटफॉर्मवरही शेअर केला आहे. हे भारतीय गाणे आहे हे माहित नसतानाही अमेरिकी लोक ‘ओ अंतवा’ या गाण्यावर थिरकताना दिसले. अनेक लोकांनी कॅरोलिनाचे व्हिडीओ रेकॉर्ड केले.
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.