Friends Viral Video : मैत्री हे जगावेगळं नातं आहे. या नात्यात प्रेम, काळजी, विश्वास आणि आपुलकी दिसून येते. हे जगातील सर्वात सुंदर नातं मानलं जाते जे कोणत्याही स्वार्थाशिवाय असते. अडीअडचणीला आपल्याला फक्त मैत्री आठवते. सुख दु:खात साथ देणारे हे फक्त मित्रच असतात. मित्र बालपणीचे असो की कॉलेजातील, ते एकमेकांसाठी जीव द्यायला तयार होतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका मुलाला पोहता येत नाही पण मित्र म्हणाला म्हणून त्याने विहिरीत उडी मारली. पुढे त्याच्याबरोबर काय घडते, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.

या व्हिडीओमध्ये मित्रांचा घोळका विहिरीजवळ असतो. त्यातला एक मित्र एका दुसऱ्या मित्राचा व्हिडीओ बनवत असतो आणि त्याला म्हणतो, “मार उडी..” तेव्हा सलाम करत तो बिनधास्तपणे उडी मारतो पण त्याला पोहता येत नाही फक्त मित्राच्या सांगण्यावरून आणि ते त्याला वाचवतील या विश्वासाने तो उडी मारतो. उडी मारल्यानंतर सर्वच मित्र पाण्यात उडी मारतात आणि त्याला वाचवतात. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. या व्हिडीओवर लिहिलेय, “विश्वास काय असतो, हा एक व्हिडीओ सांगतो.”

हेही वाचा : “फक्त गर्दीत हात धरणारी नको…” लालबागमध्ये तरुणाची पाटी पाहून सगळ्याच मुली लाजू लागल्या; असं लिहलंय तरी काय? पाहा VIDEO

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : “काका एकदम खतरनाक…”, बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणूकीत काकांनी धरला जबरदस्त ठेका; Video पाहून नेटकरी म्हणाले…

marathi_business_motivation या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “विश्वास असा ठेवायचा असतो याचं एक उत्तम उदाहरण आहे.” तर एका युजरने लिहिलेय, “त्याला माहीत होतं की मित्र आपल्याला मरू देणार नाहीत. याला म्हणतात विश्वास आणि मैत्री… मी हे अनुभवलय. मला पोहता येत नव्हतं तेव्हा असचं कराचे.” आणखी एका युजरने लिहिलेय, “डोळ्यात पाणी आलं राव एवढा विश्वास बघून ह्याला म्हणतात मैत्रीत जीवापाड प्रेम” एक युजर लिहितो, “व्हिडिओ खरंच खूप छान आहे । पण आज काल विश्वास ठेवण्यासारखी लोक खूप कमी आहे” तर एक युजर लिहितो, “लय धाडस लागतंय र अशी उडी मारायला” हा व्हिडीओ पाहून अनेक युजर्सनी या मुलाच्या धाडसाचे आणि त्याच्या मैत्रीवर असलेल्या विश्वासाचे कौतुक केले आहेत.