Viral Video News: सर्वात घातक व चाणाक्ष शिकारी कोण असा प्रश्न येताच डोक्यात आधी वाघाचं नाव आपसूकच येतं. अगदी सिंहाचा जंगलाचा राजा म्हणून ओळखलं जात असलं तरी वाघाची शक्तीही काही कमी म्हणता येणार नाही. म्हणूनच जंगलात शक्यतो सर्वच प्राणी वाघापासून आपला जीव वाचवण्यासाठी काहीसं अंतर राखून असतात. पण म्हणतात ना, काळ यायचा तेव्हा येतोच. अशाच एका सुंदर मोराची गाठभेट खरंतर भीतीदायक भेट ही वाघाशी व्हायची होतीच. मोर आणि वाघाच्या सामन्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता की, अचानक झाडीमधून अवतरलेल्या वाघाला पाहून एरवी थुई थुई नाचणाऱ्या मोराला पळता भुई थोडी झाली आहे. खरंतर वाघाने एकट्या मोरावर हल्ला केला नव्हता उलट मोरांच्या पूर्ण टोळीचा फडशा पाडण्यासाठी वाघोबा तयार होते पण इतक्यात जे घडलं त्याने वाघाला टोळी सोडा एका मोरालाही पकडता आले नाही. वाघाला पाहून सुरुवातीला पळत सुटलेल्या मोराला जसे हे समजते की आता काही आपला पळून जीव वाचणार नाही तेव्हा तो अचानक आपला पिसारा फुलवतो आणि त्याने आजूबाजूची धूळ उडवू लागतो. आणि म्हणायला गेलं तर हीच धूळ वाघाच्या डोळ्यात फेकून मग मोर संधी साधून पळून जातो.

Viral video JCB worker made little boys day remember
“कोणाच्या तरी हसण्याचे कारण बना” खोदकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी चिमुकल्याच्या चेहऱ्यावर फुलवलं हसू; VIDEO एकदा पाहाच
this unique way of crossing road was seen for the first time you will not stop laughing after watching video
VIDEO : … तर गाडीची काच फुटलीच म्हणून समजा; रस्ता ओलांडण्याची ‘ही’ पद्धत तुम्ही कधी पाहिली का?
girl playing holi with boyfriend while standing on moving scooter
चालत्या स्कुटीवर उभे राहून तरुणाला रंग लावत होती तरुणी! अचानक ब्रेक दाबला अन्…. व्हिडीओमध्ये बघा पुढे काय घडले
True and pure love
आयुष्यात फक्त असं प्रेम मिळाले पाहिजे! आजोबांना घास भरवणाऱ्या आजींचा व्हिडीओ बघाच

Video: वाघ व मोर आले आमनेसामने…

हे ही वाचा<< ‘या’ माणसाचा विचित्र आवाज ऐकून कावळेही झाले थक्क; पाच सेकंदात जमवली शेकडोंची गर्दी, Video पाहा

इंस्टग्रामवर बिलाल अहमद अशा एका अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता, आतापर्यंत या व्हिडिओला तब्बल १ कोटी १७ लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर २ लाखाहून अधिकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. अनेकांनी मोराच्या कौतुकाच्या कमेंट सुद्धा नोंदवल्या आहेत. निसर्गाने प्रत्येक जीवाला आपल्या रक्षणासाठी एक सुपरपॉवर दिली आहे फक्त आपल्याला ती वापरता आली पाहिजे अशी एक भावना सर्वच नेटकऱ्यांच्या कमेंटमधून दिसून येत आहे.