Viral Video: भारतातील रेल्वे नेटवर्क प्रचंड विस्तृत आहे. रेल्वेला भारतीयांची व मुख्यतः मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखली. या जीवनवाहिनीत जीव ओतण्याचे काम अवलिया प्रवासी करतात. आपण ट्रेनने प्रवास केला असेल तर कधी ना कधी भजनी ग्रुप बद्दल ऐकलंच असेल, अगदीच काही नाही तर पिकनिक मोड मध्ये प्रवास करणाऱ्या मित्रांच्या ग्रुपमध्ये रंगलेली अंताक्षरी पाहिली अनुभवली असेलच. हो ना? अशाच एका अवलिया कलाकार मंडळींचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे, आजपर्यंत २ लाखाहून अधिक लाईक्स मिळालेल्या या व्हिडिओमध्ये अस्सल गावरान बाजातील गाणं गाणारी टीम पाहून नेटकरी भलतेच खुश झाले आहेत.
प्रदीप मोरे या अकाउंटवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये एक मित्रांचा ग्रुप ट्रेनमधून प्रवास करताना दिसत आहे. प्रवासात सवयीप्रमाणे ते गाणी सुरु करतात. प्रसिद्ध लोककलाकार साजन बेंद्रे यांनी लिहिलेल्या व संगीतबद्ध केलेलं ‘तू नुसतं पदराला बांधायचं राहिलंय गं’ हे गाणं ही मंडळी जेव्हा गाऊ लागतात तेव्हा एकेकाचा आवाज व चेहरा बघून तुम्हीही खुश व्हाल. यामध्ये मुलं मुली एकत्र येऊन अगदी भन्नाट सुरात हे गाणं गातात.
Video: तू नुसतं पदराला बांधायचं..
हे ही वाचा<< मुंबई लोकलमध्ये ‘ती’ माईक व स्पीकर घेऊन चढली; प्रत्येक शब्दाला उंचावल्या प्रवाशांच्या भुवया, Video पाहा
दरम्यान,या व्हिडिओमध्ये मित्रांची मज्जा मस्ती पाहून नेटकरी सुद्धा आनंदून गेले आहेत. असे प्रवासी जर असतील तर प्रवासाची मज्जाच काही और होऊन जाते अशाही कमेंट यावर पाहायला मिळत आहे. तुम्हालाही हा व्हिडीओ पाहून तुमच्या अशाच खास मित्रांची आठवण आली असेल त्यांच्यासह ही लिंक शेअर करायला विसरू नका.