MBA चहावाल्यानंतर आता मार्केट गाजवायला बीटेक पाणीपुरीवाली आली आहे. मार्केटमध्ये नवा स्पर्धक सामील झाला असून तो लवकरच बाजारात पाय रोवणार असल्याचे दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगी रॉयल एनफिल्ड बुलेट घेऊन दिल्लीच्या रस्त्यांवर फिरताना दिसत आहे. तिने आपल्या बुलेटच्या मागे एक गाडी बांधून पाणीपुरीचा छोटासा स्टॉलही लावला आहे. तिने या स्टॉलला बीटेक पाणीपुरीवाली असे नाव दिले आहे. सध्या हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर वेगाने व्हायरल होत आहे.

काय व्हायरल होत आहे ‘बीटेक’ पाणीपुरीवाली –

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी रॉयल एनफिल्ड बुलेटसह दिल्लीच्या रस्त्यावर फिरताना दिसत आहे. तिने आपल्या बुलेटच्या मागे एक गाडी बांधली आहे आणि एक छोटासा पाणीपुरीचा स्टॉल लावला आहे. ती तिच्या व्यावसायासंबंधी अतिशय गंभीर असून स्वच्छ आणि आरोग्यदायी स्ट्रीट फूड विकण्याचं तिचं ध्येय आहे. तापसी म्हणाली की तिने पाणीपुरीसाठी पाण्यात चवदार मसाले घातले आहेत, जे सहसा दुकानात विकल्या जाणाऱ्या पावडरऐवजी हाताने बनवले जातात. इतर विक्रेत्यांकडून वापरल्या जाणाऱ्या पुठ्ठ्याऐवजी इको फ्रेंडली लीफ-बाऊल्समध्ये ती आपली पाणीपुरी विकते. या पाणीपुरीचं वेगळेपण म्हणजे तिच्या पुऱ्याही ती तेलात न तळता एअर फ्रायर वापरते. त्यामुळे लोकांच्या अधिक पसंतीस उतरली आहे.

navi mumbai illegal nursery marathi news
नवी मुंबई: कारवाईनंतरही रोपवाटिका उभी, एनआरआय परिसरात डीपीएस शाळेजवळील भूखंडावर पुन्हा अतिक्रमण
Fire at Phoenix Mall on Nagar Street pune
पुणे : नगर रस्त्यावर फिनिक्स मॉलमध्ये आग
Dead ants found in samosas
किळसवाणा प्रकार! कुरकुरीत समोस्यामध्ये आढळल्या मेलेल्या मुंग्या; दिल्ली विद्यापीठाच्या कॅन्टीनमधील Video Viral
Hardik Malinga Pushing Video Viral
MI vs SRH : हार्दिक पंड्याने लसिथ मलिंगाला ढकलल्याने चाहते संतापले, VIDEO होतोय व्हायरल

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – ‘ब्लू व्हेल’च्या हृदयाचं वजन ऐकून भरेल धडकी! हृदयाचा एक ठोका पडताच… हर्ष गोएंका यांची Viral पोस्ट पाहाच

या व्हिडिओमध्ये तापसीने असेही सांगितले की, प्रत्येकजण तिच्या व्यवसायाला पाठिंबा देत नाही. मी बीटेक पदवीधर आहे आणि मी एक महिला आहे म्हणून मी रस्त्यावर पाण्याची पुरी विकू नये असे मला बरेच लोक म्हणतात. मला घरी जाऊन काम करायला हवं असंही सांगतात पण मी कधीच कोणाकडे लक्ष दिलं नाही, असंही ती सांगते